उचगाव भागातील महादेव मंदिरात महाप्रसाद वितरण
विविध मंदिरात कीर्तन, जागर, रुद्राभिषेक,महापूजन : सकाळी 8 पासून महाप्रसादाला प्रारंभ
वार्ताहर/उचगाव
उचगाव परिसरातील गावांमधून महाशिवरात्रीनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमानंतर गुऊवारी सकाळी 8 वाजल्यापासूनच महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. शेतावर जाणारे शेतकरी, कामावर जाणारे कर्मचारी यांच्या सोयीसाठी सकाळी 8 वाजल्यापासून महाप्रसादाला प्रारंभ केला होता. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन, प्रवचन, महिला भजन, कीर्तन, अभिषेक, महापूजा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
उचगाव
उचगाव-गोजगे या मार्गावरील रामलिंग मंदिरामध्ये मविविध पूजा, अर्चा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. बुधवारी पहाटे मंदिरामध्ये किरणोत्सवाप्रसंगी शिवमूर्तीवर अभिषेक, पूजा, महाआरती आणि तीर्थप्रसाद, रामलिंग सेवा अभिवृद्धी संघामार्फत करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांच्या हस्ते पूजन कार्यक्रम पार पडला. गुऊवार 27 रोजी सकाळी पहाटे महाआरती, पूजा, तीर्थप्रसाद झाल्यानंतर सकाळी 8 वाजल्यापासून महाप्रसाद सुरू झाला.
गोजगे
येथील महाकलमेश्वर मंदिरामध्ये शिवरात्री उत्सव मंडळातर्फे बुधवारी पहाटेपासून भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. शिवपिंडीवर अभिषेक, पूजा, महाआरती करून भाविकांना तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. बुधवारी रात्री प्रवचन, भजन, कीर्तनाचा कार्यक्रम झाला. याचा अनेक भाविकांनी लाभ घेतला. दुपारी एक वाजता महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. गोजगे आणि परिसरातील भाविकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.
बेकिनकेरे
बेकिनकेरे येथील नागनाथ देवस्थानमध्ये दोन दिवस भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. बुधवारी पहाटेपासूनच या मंदिरातील शिवपिंडीचे दर्शन घेण्यासाठी बेकिनकेरे, अतिवाड परिसरातील नागरिकांनी गर्दी केल्याचे दिसून येत होते. गुऊवारी दुपारी महाप्रसादाला शुभारंभ करण्यात आला. यावेळी महाप्रसादासाठी रांगा लागल्याचे चित्र दिसून येत होते.
तुरमुरी
येथील कलमेश्वर मंदिरामध्ये भाविकांच्या उपस्थितीत बुधवारी शिवपिंडीवर अभिषेक, पूजा, आरती आणि तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. आणि सर्व भाविकांच्या उपस्थितीत महाशिवरात्रीचा उत्सव पार पडला. सुळगा (हि.ं) येथील ब्रह्मलिंग मंदिरामध्ये अभिषेक, पूजा महाआरती आणि तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले. बेनकनहळ्ळी येथील ब्रह्मलिंग मंदिरामध्येही अभिषेक, पूजा महाआरती व तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले.
कल्लेहोळ
येथील कलमेश्वर मंदिरामध्येही बुधवारी पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी शिवपिंडीवर अभिषेक, पूजा महाआरती करून भाविकांना तीर्थप्रसादाचे वितरण करण्यात आले.