महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महामेळावा यशस्वी करणारच!

06:54 AM Dec 01, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तालुका म. ए. समितीच्या बैठकीत निर्धार

Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

बेळगाववर आपला हक्क दाखविण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून कर्नाटक सरकार बेळगावमध्ये अधिवेशन भरवत आहे. त्याला आजपर्यंत मेळावा भरवून प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मेळाव्यालाही प्रशासनाने परवानगी देण्याचे टाळले आहे. तरीदेखील यावेळी 4 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता व्हॅक्सिन डेपो येथे मेळावा भरवून प्रत्युत्तर देण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीच्या बैठकीत करण्यात आला आहे.

या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर हे होते. मराठी बहुभाषिक असलेला हा सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात डांबला गेला आहे. तेव्हापासून आजतागायत येथील मराठी भाषिक कर्नाटक सरकारच्याविरोधात लढा देत आला आहे. यापुढेही लढा देणारच. या मेळाव्याच्या जनजागृतीसाठी अकरा जणांची कमिटी करण्यात आली असून त्या कमिटीच्या माध्यमातून प्रत्येक गावात जनजागृती केली जाणार आहे.

यावेळी मनोज पावशे यांनी कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर करत असलेल्या अन्यायाबरोबरच इतर माहिती दिली. कोणत्याही परिस्थितीत हा मेळावा यशस्वी करण्याचा असून कार्यकर्त्यांनी एकजुटीने राहून या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. चेतन पाटील, शिवाजी खांडेकर यांनी पोटतिडकीने आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. केवळ निवडणुकीपुरते काही जण येत आहेत. मात्र, मेळावा किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी ते उपस्थित रहात नाहीत. त्यांना यापुढे समितीत स्थान देऊ नका, असे त्यांनी सांगितले.

माजी आमदार मनोहर किणेकर यांनीही केंद्र सरकारने केलेल्या चुकीमुळे येथील मराठी भाषिक आजतागायत यातना भोगत आहेत. मुंबई प्रांतात असल्यापासून येथे सर्व व्यवहार मराठीत होत होते. मात्र, त्याचे कानडीकरण करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयात खटला असला तरी रस्त्यावरील लढाई लढणे गरजेचे असून मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित रहावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी आर. एम. चौगुले, रामचंद्र मोदगेकर, बी. डी. मोहनगेकर, लक्ष्मण होनगेकर, रामचंद्र कुद्रेमानीकर, सुनील आवडण, यल्लाप्पा मरगाण्णाचे यांनीही आपले विचार व्यक्त केले. म. ए. समितीचे सरचिटणीस अॅड. एम. जी. पाटील यांनी आभार मानले.

मध्यवर्ती म. ए. समितीवरसदस्य निवडीसाठी कमिटी

मध्यवर्ती समितीवर तालुक्यातून सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी अकरा जणांची कमिटी करण्यात येणार आहे. ती विभागवार कमिटी राहणार असून या कमिटीने शिफारस केलेल्यांची मध्यवर्ती समितीवर वर्णी लावण्यात येणार आहे. याबाबत या बैठकीत ठराव करण्यात आला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article