जनतेच्या प्रश्नांची महाडिकांना काहीही देणे-घेणे नाही
कोल्हापूर :
महाडिकांनी आजपर्यंत केवळ सत्तेला चिकटूनच राजकारण केले. जिकडे सत्ता तिकडे यांची गाडी वळते. त्यामुळे जनतेचे प्रश्न, विकासकामे याच्याशी त्यांना काही देणे- घेणे नाही. सगळी पदे आपल्याच घरी हीच महाडिकांची प्रवृत्ती असल्याची टीका शिवसेना ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे यांनी केली. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आ.ऋतुराज पाटील यांच्या प्रचारार्थ दिंडनेर्ली येथील प्रचारसभेत ते बोलत होते.
आ. ऋतुराज पाटील पुढे म्हणाले, गेली पाच वर्षे दक्षिणच्या पीचवर मी सतत बॅटिंग करत आहे. लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवल्या आहेत. येथील जनतेशी माझी नाळ घट्ट जुळली आहे. गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकांच्या जोरावर मी पुन्हा मैदानात उतरलो आहे. जनतेच्या पाठींब्यावर दक्षिणच्या या मैदानात मीच षटकार मारणार असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला.
गोकुळ संचालक शशिकांत पाटील चुयेकर म्हणाले, आ. ऋतुराज पाटील हे गायरान जमिनीत क्रीडांगण विकसित करणारे पहिले आमदार आहेत. पाणी योजनेसह विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदारसंघात विकास गंगा त्यांनी आणली आहे. नाविन्यपूर्ण संकल्पनेतून मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्राया आमदार ऋतुराज पाटील यांना मोठे मताधिक्य द्या.
डॉ. अनिल पाटील म्हणाले, आ.ऋतुराज पाटील यांनी दिंडनेर्लीला भरघोस निधी दिला. गावातील प्रत्येक घटकांसाठी काम केले. शेतक-यांचे प्रश्न मार्गी लावले. गावातील पाणी योजना असो किंवा रस्ते असतील ही कामे त्यांनी प्राधान्याने केली. त्यामुळे ऋतुराज पाटील यांना पुन्हा आमदार करुया.
प्रा.निवास पाटील म्हणाले, सतत सर्वासाठी उपलब्ध असलेले, विकासाचे व्हिजन असलेले दमदार युवा नेतृत्व आ. ऋतुराज पाटील यांना साथ म्हणजे विकासाला साथ. यावेळी शाहीर उदय भोसले यांनीही मनोगत व्यक्त केले. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सचिन कदम, शहाजी कांबळे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करत ऋतुराज पाटील यांना पाठिंबा जाहीर केला.
सभेला ह.भ.प. रामचंद्र पाटील, अनिल मोरे, करण काकडे, माजी सरपंच संभाजी बोटे, शांताराम बोटे, दिगंबर पाटील, संजय परीट, जे एस माने, सरदार तिप्पे, उमेश पाटील, भीमराव मगदूम, एन के पाटील, भैरीनाथ बोटे, राजू चौगले, रंगराव शिंदे, हंबीरराव वाडकर, दयानंद जंगम, संगीता गुरव, सुनिता पाटील, प्रकाश कांबळे, आप्पासो माने यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.