महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

बेळवट्टी ग्रा. पं. अध्यक्षपदी महादेवी मेदार, उपाध्यक्षपदी बाबुराव पाटील

11:26 AM Jul 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्यक्ष बिनविरोध, तर उपाध्यक्ष पदासाठी चुरशीने मतदान

Advertisement

किणये : बेळवट्टी ग्रामपंचायत अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी सोमवारी दुपारी ग्रामपंचायतीच्या कार्यालयात निवडणूक झाली. अध्यक्षपदी महादेवी मेदार यांची बिनविरोध निवड झाली. तर उपाध्यक्ष पदासाठी चुरशीने मतदान झाले. यामध्ये बाबुराव पाटील हे विजयी झाले. बेळवट्टी ग्रामपंचायतमध्ये एकूण 11 ग्रामपंचायत सदस्य आहेत. तर या ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात बेळवट्टी, इनाम बडस, बाकनुर, धामणे एस. या गावांचा समावेश आहे. अध्यक्षपदासाठी अनुसूचित जमाती महिला व उपाध्यक्षपदासाठी सामान्य असे आरक्षण होते. अध्यक्ष पदासाठी महादेवी मेदार यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी बाबुराव पाटील व विठ्ठल पाटील या दोघांनी अर्ज दाखल केले. ग्रामपंचायतच्या कार्यालयात बॅलेट पेपरद्वारे निवडणूक झाली. यामध्ये बाबुराव पाटील यांना पाच व विठ्ठल पाटील यांना पाच अशी मते मिळाली. यामध्ये एक मतदान अवैध ठरले. दोघांनाही समान मते मिळाल्यामुळे चिट्टी काढण्यात आली. यामध्ये बाबुराव पाटील यांच्या नावाची चिठ्ठी आली असल्यामुळे त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाली. निवडणूक अधिकारी म्हणून वॉटर डिपार्टमेंटचे अशोक शिरूर पीडिओ हर्षवर्धन हे उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेला एकूण सर्व 11 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article