महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महादेव बेटिंग अॅपचे धागेदोरे गांधी कुटुंबियापर्यंत ?

06:42 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महादेव बेटिंग अॅपच्या दुबई तसेच गल्फमधील धंद्यांना डॉन दाऊद इब्राहीमने संरक्षण पुरविले आहे. याच अॅपचा मास्टरमाईंड असलेल्या सौरभ चंद्राकर आणि रवि उप्पल यांच्याकडून छत्तीrसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल यांना गोणीच्या गोणी भऊन पैसा पुरविला गेला. हाच पैसा पुढे गांधी घराण्यापर्यंत पोहचविल्याचा संशय ईडीला आहे. यामुळे ज्या देशद्रोह्याने संरक्षण पुरविले अशा मास्टरमाईंडचा पैसा हा गांधी कुटुंबियापर्यंत पोहचत असेल तर याहून मोठा देशद्रोह काय?

Advertisement

एखादा गुन्हा करण्यात गुन्हेगार यशस्वी झाल्यानंतर त्याला अनेक गुन्हे करण्याची चटक लागते. नंतर हेच गुन्हे त्याच्या आयुष्याचा एक भाग बनतात. कालांतराने या गुह्यांच्या अपकिर्तीमुळे स्वत:चे चारित्र्य धुऊन काढण्यासाठी गुन्हेगार मार्ग निवडतात तो राजकारणाचा. याबाबतची अनेक उदाहरणे ताजी आहेत. कॉंग्रेसने केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना अनेक वाल्यांचा वाल्मिकी केला. कारण या गुन्हेगारांकडून मिळालेल्या पैशातून सत्ताबदल करण्याचे काम राजकारण्यांनी केले आहेत. अशाच प्रकारे पुन्हा एकदा  छत्तीसगड आणि केंद्रात सत्ता आणण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुऊ असतानाच याचा सुगावा अंमलबजावणी संचालनालयाला लागला आणि याचा भांडाफोड करीत देशातील सर्वात मोठा महादेव अॅप घोटाळा उघडकीस आणला. वरवरुन साधा वाटलेल्या या घोटाळयाची पाळेमुळे हे अंडरवर्ल्ड, बॉलिवूड राजकारण्यापर्यंत पोहचलीच मात्र आता ती गांधी घराण्यांपर्यत देखील पोहचली आहेत.

Advertisement

महादेव बेटिंग अॅपचा जन्मदाता असलेल्या सौरभ चंद्राकर याचे गांधी घराण्यांपर्यत संबंध असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे तत्कालीन छत्तीसगडचे मुख्यमंत्री असलेले भुपेश बघेल यांचा मनी बँक हा सौरभ चंद्राकर असून, त्याच्याच पैशाच्या जीवावर 2023 साली देखील भुपेश बघेल हे छत्तीसगडच्या सत्तेची पुन्हा स्वप्ने पाहत होते. यादरम्यान 2020 साली तपास यंत्रणांच्या हाती मोठ्या घोटाळ्याची केवळ माहिती होती मात्र पुरावे नव्हते. त्यातच प्राप्तिकर विभागाने सन 2020 मध्ये छत्तीसगडमध्ये अनेक व्यावसायिक, राजकीय व्यक्ती आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर छापे टाकले. चौकशीदरम्यान ’महादेव अॅप’चे नाव पुढे आले. मात्र हे अॅप नेमके काय आहे? याबाबत कोणालाही कसलीही माहिती नव्हती. मात्र सतर्क झालेल्या सर्व तपास यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली. अखेर ‘ईडी’ने ऑगस्ट 2023 मध्ये छत्तीसगडचे सहायक उपनिरीक्षक चंद्रभूषण वर्मा, सतीश चंद्राकर, हवाला ऑपरेटर अनिल दम्मानी आणि सुनील दम्मानी यांना अटक केल्यानंतर पहिल्यांदा महादेव अॅपबाबत जाहीरपणे माहिती समोर आली. मात्र या अॅपच्या माध्यमातून काही छुप्पेरुस्तम असलेल्या अनेकांनी आपले खिसे गरम करण्यास सुरुवात केली होती. यातील सर्वात मोठा बादशाह होता तो छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल. त्यांच्या माध्यमातून गांधी घराण्यापर्यंत गोणीच्या गोणी पैशांच्या भरुन जात होत्या. एवढेच नाही तर गांधी घराण्यांची परदेशात सर्व सुख-सोयीयुक्त अशी सोय सौरभ चंद्राकरच्या माध्यमातून होत असल्याचे वास्तव समोर आले आहे. जर ईडीने आणखी याप्रकरणाचा सखोल तपास केला तर यामध्ये भुपेश बघेल यांच्यासह राहुल गांधीदेखील गजाआड ज़ाण्याची शक्यता आहे. कारण या घोटाळ्याची व्याप्ती पाहता केवळ मनी लॉड्रींगपर्यंत नसून ती दहशतवादी कारवायापर्यंत पोहचू शकते.

छत्तीसगडच्या एका शहरात साधा ज्युस सेंटर चालविणारा सौरभ चंद्राकर आणि टायरचे दुकान चालविणारा रवि उप्पल हे दोघे मित्र. या दोघांनी ज्युसची साखळी तसेच टायर दुकानांची साखळी तयार करीत पैसे कमाविण्यास सुरुवात केली होती. अशातच या दोघांनी फिरण्यासाठी म्हणून दुबई गाठली. येथेच ते ऑनलाईन गेमिंग तस्कर आणि मालकांच्या संपर्कात आले. त्यातच त्यांना महादेव अॅपची संकल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी या अॅपच्या माध्यमातून अनेक ऑनलाईन जुगार सुरु केले. यातून चंद्राकर याच्याकडे त्याच्या अपेक्षापेक्षा अधिक पैशांचा ओघ सुरु झाला. सातत्याने पैशाचा वाढता ओघ पाहता, सौरभ चंद्राकरने छत्तीसगडमधील अनेक राजकारण्यांना हाताशी धरत अनेक सरकारी परवानग्या मिळविल्या. तर महादेव अॅपच्या प्रमोशनसाठी त्याने संपूर्ण बॉलिवूडच मैदानात उतरविले. अशातच माशी शिंकली आणि सौरभ चंद्राकरचे ग्रह फिरले. सौरभ चंद्राकर याच्या सुमारे दोनशे कोटींच्या शाही लग्नसोहळ्यात बॉलिवूडमधील अनेकांनी हजेरी लावली आणि काहींनी तर आपली अदाकारी सादर केली. यापूर्वीच महादेव अॅपच्या हालचालीवर तसेच त्यांच्या कर्त्याधर्त्यावर नजर ठेऊन असलेल्या तपास यंत्रणा सज्ज झाल्या. सुमारे 200 कोटी रुपये शाही लग्नसोहळयात खर्च करणाऱ्या चंद्राकरावर ईडीने गुन्हा दाखल करीत तपासाला सुरुवात केली. इतिहास पाहिला तर गुन्हेगारांनी आयोजीत केलेल्या शाही पार्ट्यामुळेच अनेक सेलिब्रेटी अडचणीत आले आहेत. यापूर्वी देखील अंडरवर्ल्डचा चिंधी डॉन दाऊद इब्राहीमने आयोजीत केलेल्या पार्टीला अनेक बॉलिवुडच्या सिनेतारकांनी, अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. यामुळे हे सर्वजण अडचणीत आले होते. तसाच प्रकार सौरभ चंद्राकरच्याबाबतीत घडला.

या लग्नसोहळ्यामुळे बॉलिवूड, महादेव अॅप आणि हवालामार्फत कोट्यावधींची झालेली देवाणघेवाण तपास यंत्रणांच्या रडारवर आली. या शाही लग्नसोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर रोखीमध्ये व्यवहार झाला. हे सर्व ईडीच्या रडारवर आले. यावेळी त्यांनी तत्काळ अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना चौकशीसाठी नोटीसा पाठविण्यास सुरुवात केली. ज्या महादेव बेटिंग अॅपचा वापर करीत करोडो रुपये सौरभ चंद्राकर मिळवित आहे. ग्राहकांनी कंपनीच्या खात्यात दिलेले पैसे, हेच उत्पन्न असल्याचे समोर आले. बेटिंगमधून ग्राहकाला पैसे मिळत होते. मात्र, ज्या खात्यातून हे पैसे मिळत होते. त्यासाठी बनावट ओळखपत्रांचा आधार घेण्यात आला होता. वेगवेगळ्या प्रकारची शेकडो बँक खाती अॅपला जोडण्यात आली असून त्यातून सर्व आर्थिक व्यवहार केला जात असल्याचे निदर्शनास आले.

करोनाकाळात म्हणजे सन 2020 मध्ये ज्या वेळी ‘आयपीएल’चे सामने प्रेक्षकांविना खेळविले गेले, त्या वेळी महादेव अॅपने सट्टेबाजीत सुमारे दोन हजार कोटींची उलाढाल केल्याचा अंदाज तपास यंत्रणांना आहे. यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात हा घोटाळा असल्याने, हा पैसा याची प्रसिद्धी करण्यासाठी वापरला गेल्याचे समोर आले. कारण बॉलिवूडमधील डझनापेक्षा अधिक अभिनेते आणि अभिनेत्री तपास यंत्रणांच्या चौकशीच्याफ़ेऱ्यात अडकलेली आहेत. यातील काहींनी अॅपची जाहिरात केली, तर काही जण चंद्राकर याच्या लग्न आणि सक्सेस पार्टीमध्ये सहभागी झाल्याचे समोर आले. त्यानुसार ईडी सतर्क होत कोलकाता, भोपाळ, मुंबईसह सुमारे 39 शहरांमध्ये छापासत्र राबविण्यास सुरुवात केली.

मात्र, हा सर्व तपास सुरु असतानाच, सौरभ चंद्राकर याचे संबंध देशद्रोही असलेल्या दाऊद इब्राहीमपर्यंत असल्याचे समोर आले. दुबईतील सौरभ चंद्राकर याच्या अनेक व्यवसायाना दाऊदने संरक्षण दिले होते. तर दाऊदने देखील पाकिस्तान आणि गल्फमध्ये विविध अॅपच्या साह्याने ऑनलाईन जुगार सुरु केल्याचे निदर्शनास आले. याच जुगारातून मिळालेला पैसा हा भुपेश बघेलच्या माध्यमातून गांधी कुटुंबियांपर्यंत पोहचत असेल तर हा नक्कीच देशद्रोह आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article