पाचगणी- गुरेगर येथील अवैद्य बांधकाम महाबळेश्वर महसूल विभागाने पाडले
कुडाळ प्रतिनिधी
महाराष्ट्राचा मिनी काश्मीर महाबळेश्वर तालुक्यात पुन्हा अवैध बांधकाम आणि तोंड वर काढले होते यावर जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांच्या आदेशानुसार महाबळेश्वर तहसीलदार खोचरे पाटील यांनी आज सकाळी सहा वाजता चा कारवाईचा बडगा उगारला आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या अवैध बांधकामावर आज हातोडा टाकला आहे अचानक रविवारीच्या दिवशी अवैध बांधकामावर सकाळपासूनच कारवाई सुरू झाल्याने पाचगणी महाबळेश्वर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
आज सकाळपासून पाचगणी येथील गुरेघर येथील अनधिकृत बांधल्या गेलेल्या बंगल्यांवर थेट जेसीबीच्या आणि पोकलेन च्या साह्याने हे बंगले महाबळेश्वर महसूल विभागाकडून जमीन दोस्त करण्यात आले महाबळेश्वर महसूल विभागाचे शंभरहून अधिक कर्मचारी पोलीस या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
पाचगणी येथील गुरेघर मध्ये प्राची दिनेश नागपूरवाला उधम पंचमढीया असे अवैध बांधकाम करणारे परप्रांतीयांची नावे आहेत. पाचगणी गुरेघर येथील भले मोठे तीन अनाधिकृत बंगले पाचगणी गुरेघर येथील पाडण्यात आले आज सकाळी सहा वाजल्यापासून हे मोहीम सुरू झाली आहे. या कारवाईचा धसका पुन्हा अवैध बांधकाम करणाऱ्यांनी घेतला आहे.