For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara : महाबळेश्वर-पाचगणीत थंडीचा कहर !

02:56 PM Nov 16, 2025 IST | NEETA POTDAR
satara   महाबळेश्वर पाचगणीत थंडीचा कहर
Advertisement

                               पर्यटनस्थळांवर 'मिनी काश्मीर'ची अनुभूती : पारा १२ अंशाखाली

महाबळेश्वर/पाचगणी
: सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर-पाचगणीमध्ये -गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका प्रचंड वाढला आहे. सलग आठ दिवस तापमानात होत असलेली घसरण आता प्रकर्षाने जाणवू लागली असून, सकाळ संध्याकाळ पर्वतरांगांवर 'हुडहुडी' वाढली आहे. दाट धुक्याची चादर, सरीसरीत गार वारा आणि कंप सुटायला लावणारी थंडी यामुळे या दोन्ही पर्यटन स्थळांवर जबरदस्त 'विंटर वाइब्स'
महाबळेश्वर : वाढलेल्या थंडीत वेण्णा लेक परिसरात गरमागरम मक्याचे कणीस खाण्याचा आनंद लुटताना पर्यटक, निर्माण झाले आहेत.

Advertisement

महाबळेश्वर शहरात किमान १२ ते १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत असून वेण्णा लेक परिसर, केट्स पॉइंट, विल्सन पॉइंट येथे तर याहून कमी तापमान जाणवत आहे.सकाळच्या सत्रात वेण्णा लेक परिसर धुक्याने व्यापला जात असल्याने पर्यटक अपवादानेच फिरकताना दिसत आहेत. मात्र दुपारनंतर वातावरण थोडेसे सौम्य झाल्यावर येथे मोठी गर्दी होत असून पर्यटक सह्याद्रीच्या निसर्गरम्य कुशीत वसलेल्या या दोन्ही हिल स्टेशन्सवर थंडीचा गारवा, धुक्याची दुलई आणि मोहक निसर्गामुळे पर्यटनाला अक्षरशः 'चार चाँद' लागले आहेत. पुढील काही दिवस तापमान आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त होत असून, महाबळेश्वर-पाचगणीमध्ये थंडीचा कडाका अधिक जाणवणार आहे.

नैसर्गिक देखाव्याचा आनंद लुटत आहेत. पाचगणीतील टेबललैंड, सिडनी पॉइंट, पारसी पॉइंट परिसरातही गार वाऱ्यांनी वातावरण महाबळेश्वर-पाचगणीत थंडीचा कहर पूर्णपणे थंडगार केले आहे. येथील पठारी हवामानामुळे सकाळी आणि सायंकाळी तापमानात तीव्र घसरण जाणवत आहे. शाळकरी मुलांपासून ते पर्यटकांपर्यंत सर्व जण स्वेटर, मफलर, कानटोपी, जॅकेट्सचा आधार घेताना दिसत आहेत. स्थानिक दुकानदारांवर हिवाळी कपड्यांच्या खरेदीसाठीही मोठी गर्दी होत आहे.

Advertisement

महाबळेश्वर-पाचगणी परिसरातील निसर्ग थंडीमुळे अधिकच खुलला आहे. धुक्यातून डोकावणारे हिरवेगर्द जंगल, सूर्यकिरणांनी उजळणारे कडे, धुक्याने झाकलेली दऱ्या आणि पाणथळ जागी चमकणारे थेंब यामुळे पर्यटक मंत्रमुग्ध होत आहेत. विशेषतः सकाळी विल्सन पॉइंटवरील 'सनराईज व्ह्यू' आणि सायंकाळी मंकी पॉइंट, एल्फिन्स्टन पॉइंटवरील 'सनसेट' मोठ्या प्रमाणात पर्यटकांना आकर्षित करत आहेत.

थंडीची तीव्रता इतकी वाढली आहे की, महाबळेश्वर-पाचगणी शहरात अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक शेकोटी पेटवून ऊब घेताना दिसत आहेत. हॉटेल्स, होमस्टे आणि रिसॉर्ट्समध्येही 'बोनफायर नाईट्स'ची मागणी वाढली असून पर्यटक थंडीचा खास अनुभव घेत आहेत. महाबळेश्वर सोडून काही किलोमीटर खाली उतरल्यावर जाणवणारी बोचरी थंडी आणि महाबळेश्वरमधील गुलाबी, रोमँटिक थंडी यातील फरक अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येथे येत आहेत.

पर्यटन व्यावसायिकांच्या मते, डिसेंबरपूर्वीच अशी थंडी जाणवणे हे पर्यटकांसाठी वरदान ठरले आहे. आठवड्याच्या शेवटी महाबळेश्वर-पाचगणी परिसरात हॉटेल बुकिंग फुल झाल्याची माहिती मिळत आहे. विशेषतः हिवाळ्याचे पर्यटन, हनिमून कपल्स, निसर्गप्रमी आणि फोटोग्राफर्स यांच्यासाठी हा काळ 'गोल्डन सीझन' ठरत आहे.

Advertisement
Tags :

.