महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महाबल मिश्रा ‘आप’मध्ये सामील

06:24 AM Nov 21, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महापालिका निवडणुकीपूर्वी काँग्रेसला झटका

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

काँग्रेसचे दिल्लीतील वरिष्ठ नेते महाबल मिश्रा यांनी रविवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचे माजी खासदार तसेच तीनवेळा आमदार राहिलेले महाबल मिश्रा यांनी पहाडगंजमध्ये मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या उपस्थितीत ‘आप’चे सदस्यत्व स्वीकारले आहे.

दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी 4 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 7 डिसेंबर रोजी होणार आहे. तीन महापालिकांचे एकत्रीकरण केल्यावर होणारी ही पहिलीच निवडणूक असणार आहे. 

काँग्रेस पक्षात मी दीर्घकाळ कार्यरत होतो. परंतु काँग्रेसला तळागाळाशी जोडले गेलेल्या कार्यकर्त्याशी देणेघेणे नाही. पक्षात उपेक्षित वाटू लागल्यानेच आम आदमी पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षासाठी सातत्याने काम करणार असल्याचे महाबल मिश्रा यांनी म्हटले आहे.

2020 मध्ये काँग्रेस पक्षाने महाबल मिश्रा यांनी ‘आप’ उमेदवाराचा प्रचार केल्याप्रकरणी निलंबित केले होते. आम आदमी पक्ष वीज-पाणी मोफत देत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात मोठी सुधारणा आम आदमी पक्षाने घडवून आणल्यानेच हा निर्णय घेतल्याचा दावा मिश्रा यांनी केला आहे.

महाबल मिश्रा यांचे पुत्र विनय मिश्रा हे आम आदमी पक्षाचे नेते ओत. विनय हे द्वारका मतदारसंघाचे आमदार आहेत. दिल्लीतील पूर्वांचलची पार्श्वभूमी असलेल्या मतदारांवर महाबल मिश्रा यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. याचमुळे महाबल यांचा आप प्रवेश काँग्रेससाठी मोठा झटका असल्याचे बोलले जात आहे. यंदाच्या महापालिका निवडणुकीत आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात थेट लढत होणार असली तरीही काँग्रेसने जोरदार प्रचार चालविला आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article