मॅगव्हिल चोरुन दुचाकी फेकल्या विहिरीत
कोल्हापूर :
निव्वळ मॅगव्हिल चाकासाठी दुचाकी चोरणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. वैभव यशवंत माने (वय 28, मूळ रा. कुरळप, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. शिये, ता. करवीर), दीपक दादासो शिसाळ (वय 31, रा. विठ्ठलनगर, शिये, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी मॅगव्हिल काढून घेऊन चोरीच्या चार दुचाकी शिये गावानजीकच्या विहिरीत फेकून दिल्या. त्या जीवरक्षक दिनकर कांबळे यांच्या मदतीने पोलिसांनी विहिरीतून बाहेर काढल्या. चोरांनी आणखी चोरीच्या दुचाकी पंचगंगा नदीत व अन्य विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली. तेथे शोध कार्य सुऊ केले आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना माहिती मिळाली की, शिये (ता. करवीर) येथील वैभव माने काहीएक कामधंदा करीत नसून, दुचाकीची चोरी कऊन स्पेअरपार्ट विक्री करीत आहे. तसेच त्याच्या घरामध्ये दुचाकीचे अनेक स्पेअरपार्ट आहेत. यावऊन पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरावर छापा टाकला. त्यावेळी घरात दुचाकीची 8 मॅगव्हिल चाके मिळून आली. ती जप्त कऊन, त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुऊ केली. चौकशीमध्ये त्याने जप्त केलेल्या 8 मॅगव्हिल चाकाच्या चार दुचाकी गावाशेजारच्या नागर खणीच्या बाजूला असलेल्या विहिरीत फेकून दिल्याचे सांगितले.
त्यावऊन पोलिसांनी जीवरक्षक दिनकर कांबळे यांना बोलावून घेतले. त्याच्या मदतीने विहिरीत फेकून दिलेल्या त्या चार दुचाकीचा शोध सुऊ केला. बऱ्याच वेळाने चार दुचाकी जीवरक्षक कांबळेला शोधण्यास यश आले. त्या पाण्यातून बाहेर काढून जप्त करीत, त्याला अटक केली. त्याच्याकडे पुन्हा पोलिसांनी कसून चौकशी सुऊ केली. त्यावेळी त्याने मी आणि माझा मित्र दीपक शिसाळ (रा. शिये) या दोघांनी दुचाकीच्या चोऱ्या केल्याचे सांगितले. त्यावऊन पोलिसांनी त्याचा शोध घेऊन, त्यालाही तत्काळ अटक केली.
- 6 ते 7 महिन्यापासून करीत होते चोऱ्या
स्पेअरपार्टसाठी दुचाकी चोरणाऱ्या वैभव माने, दीपक शिसाळ या दोघांना पोलिसांनी अटक केली. या दोघा चोरट्यांनी 6 ते 7 महिन्यापासून दुचाकी चोरण्यास सुऊवात केली होती. दोघांनी शाहूपुरी ठाण्याच्या हद्दीतील कसबा बावडा येथील सेवा ऊग्णालय, सनराईज हॉस्पीटल, शिवाजी पार्क, ताराबाई पार्कमधील डी मार्ट आणि लक्ष्मीपुरी ठाण्याच्या हद्दीतील सीपीआर परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे.