For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरवडे येथील केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये मळगाव शारदा विद्यालयाचे घवघवीत यश

04:02 PM Dec 15, 2023 IST | अनुजा कुडतरकर
निरवडे येथील केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये मळगाव शारदा विद्यालयाचे घवघवीत यश
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
निरवडे शाळा नं.१ येथे पार पडलेल्या मळगाव केंद्रस्तरीय स्पर्धांमध्ये मळगाव -रस्तावाडी येथील शारदा विद्यालय या जिल्हा परिषद शाळेने घवघवीत यश मिळविले. यावेळी घेण्यात आलेल्या विविध सांघिक व वैयक्तिक स्पर्धांमध्ये या शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
मंगळवार व बुधवार अशा दोन दिवस सुरु असलेल्या या स्पर्धाना विद्यार्थ्याचा व शिक्षकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.यात समूहनृत्यामध्ये मळगाव रस्ता शाळेने प्रथम क्रमांक मिळविला.तसेच सांघिक खेळात रिले मुलगे प्रथम क्रमांक,कबड्डी मुलगे प्रथम,क्रमांक, कबड्डी मुली प्रथम क्रमांक,खो खो मुलगे प्रथम क्रमांक,खो खो मुली द्वितीय क्रमांक,प्राप्त करत शाळेला यश संपादन करुन दिले.
यावेळी घेतलेल्या वैयक्तिक खेळात दशरथ पंढरीनाथ गावकर लांब उडी तृतीय क्रमांक,अनुष्का सूर्यकांत गावडे १०० मीटर धावणे तृतीय क्रमांक,दशरथ पंढरीनाथ गावंकर ५० मीटर धावणे द्वितीय क्रमांक,ओम मदन शिरोडकर उंचउडी द्वितीय क्रमांक,यांनी उज्ज्वल यश प्राप्त केले.सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे शाळा शिक्षकवृंद मुख्याध्यापक अनुराधा सुर्वे,सिमा सावंत,अस्मिता गोवेकर,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गोपाळ नार्वेकर,सदस्य सिद्धेश तेंडोलकर,सच्चिदानंद मेस्री,माधवी शिरोडकर,विजय ठाकूर,पालक आनंद शिरोडकर,अनुष्का शिरोडकर,मदन शिरोडकर,माजी विद्यार्थी यांनी अभिनंदन करुन भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Advertisement

Advertisement
Tags :

.