महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ओटवणेतील जादूगार वैभवकुमारला वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्डचा किताब

04:29 PM Sep 29, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

नवी दिल्लीतील इंटरनॅशनल मॅजिक जादू फेस्टिवलमध्ये सन्मान

Advertisement

ओटवणे । प्रतिनिधी

Advertisement

नवी दिल्ली येथे झालेल्या इंटरनॅशनल मॅजिक जादू फेस्टिवल २०२४ मध्ये ओटवणे गावचा सुपुत्र असलेला प्रसिद्ध जादूगार वैभवकुमार याने जादूच्या प्रयोगांचे सर्वोत्कृष्ट सादरीकरण केल्यामुळे त्याला वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड हा किताब देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय मॅजिक जादू महोत्सवातून सिंधुदुर्गचे नाव पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर पोहोचले. या दोन दिवसीय फेस्टिव्हलमध्ये देश - विदेशातील सुमारे ४०० हून अधिक नामवंत जादूगारांनी सहभाग घेतला होता.या फेस्टीव्हलच्या वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्ड या विशेष कार्यक्रमात आपली कला सादर करण्यासाठी जगभरातील काही मोजक्याच जादूगारांची निवड करण्यात आली होती. त्यात जादूच्या प्रयोगात अल्पावधीतच नाव कमावलेले सिंधुदुर्गचे सुपुत्र जादूगार वैभवकुमार याची निवड करण्यात आली होती. त्यामुळे त्याला या दिल्ली महोत्सवात आपले जादुचे प्रयोग सादर करण्याची संधी मिळाली.या इंटरनॅशनल मॅजिक जादू फेस्टिवलमध्ये भारतातील काश्मीरपासून ते कन्याकुमारी ते हिमाचल प्रदेश, गोवा, महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश या अनेक राज्यासह परदेशातील ऑस्ट्रेलिया, थायलंड, मलेशिया, कोरिया, सिंगापूर, दुबई, श्रीलंका, कतार अशा अनेक देशातील नामवंत जादूगारांनी जादूचे प्रयोग सादर करुन आपल्या देशातील जादू विषयी आणि जादूतील शिस्तीविषयी मार्गदर्शन केले. तसेच भारतातील प्रत्येक राज्यातील जादूगारांनीही आपल्याकडील विशेष जादूच्या प्रयोगांचे सादरीकरण करताना त्यामागील रहस्यही सांगितले.जादूगार वैभवकुमार याने या इंटरनॅशनल मॅजिक फेस्टिवलमध्ये आपल्याकडे असलेल्या रिकामी पिशवीतून जादूने मॅजिक ट्रिक करुन भारताचा मोठा झेंडा काढून तो जादूच्या काठीला लावून प्रेक्षकांसमोर फडकवला. तसेच मॅजिक टू म्युझिक या पुस्तकातील चित्रातील गिटारला खरीखुरी गिटार साकारून ती प्रेक्षकांसमोर वाजवून दाखविली. डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या जादूगार वैभवकुमार यांच्या जादूच्या या दोन्ही प्रयोगात प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करीत दाद दिली. जादूगार वैभवकुमार याच्या या जादूच्या कलेने विदेशातील जादूगारांनाही मोहिनी घातली. त्यांनी या जादुंच्या प्रयोगाचे मोबाईलवर शूटिंग करून परदेशात पाठविले. तसेच या विदेशी जादूगारांनी आपल्या देशात जादूची कला सादर करण्यासाठी जादूगार वैभवकुमार याला निमंत्रित केले. त्यामुळे लवकरच तो परदेशात जाऊन आपली कला सादर करणार आहेत.यावेळी दिल्लीतील जादू संस्थेचे अध्यक्ष डॉ अशोक खरबंदा यानी जादूगार वैभवकुमार यांनी दिल्लीत रोवलेला जादूचा झेंडा असाच देश विदेशात असाच फडकत राहील असे गौरवोद्दगार काढले. यावेळी जादूगार वैभवकुमार याला वर्ल्ड बुक ऑफ टॅलेंट रेकॉर्डचा किताब त्यांना देऊन तसेच स्मृतिचिन्ह, मोमेंटो, गोल्ड मेडल, सर्टिफिकेट्स व त्यांच्या नावाचा स्कार्फ देऊन आयोजकांकडून सन्मानित करण्यात आले. येत्या फेब्रुवारी महिन्यात भारतात जगन्नाथपुरी येथे आंतरराष्ट्रीय जादूसंमेलन होणाऱ होणार आहे. या संमेलनासाठी त्याला निमंत्रित करण्यात आले असून या संमेलनातही तो जादूच्या उत्कृष्ट प्रयोगांचे सादरीकरण करून पुन्हा एकदा सिंधुदुर्गचे नाव उज्ज्वल करणार आहे.लहानपणापासून जादूची आवड असणार वैभव पारकर म्हणजे जादूगार वैभवकुमार याने पारंपारिक नोकरी किंवा व्यवसाय न निवडता जादूचे प्रयोग या आगळ्यावेगळ्या व्यवसायाकडे वळला. जादूचे प्रयोग सादर करून रसिकांचे मनोरंजन करण्यासह तणाव मुक्त जीवन कसे जगावे हे जादूच्या प्रयोगातून दाखवून दिले. जादूला भाषा तसेच वय नसते त्याचप्रमाणे पाच वर्षाच्या मुलांपासून ८५ वर्षापर्यंतचे ज्येष्ठ नागरिकही बेहद्द खूष होतात. त्यांच्या कार्यक्रमाला मनापासून खळखळून हसत दाद देताना वृध्द आपले वयही विसरतात. त्यांना लाभत असलेल्या या सर्वांचा आबालवृद्धांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे त्यांना आजपर्यंत शेकडो कार्यक्रम सादर करण्याची संधी प्राप्त झाली आहे.जादूचा इतिहास व आधुनिक काळातील जादू या विषयावरील त्याचे पुस्तक लेखन अंतिम टप्प्यात असून लवकरच या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. त्याचे आजवरचे जादूचे अनेक व्हीडीओ जादूगार वैभवकुमार या यूट्यूब चॅनलवर आहेत. जादूगार वैभवकुमार यांनी आजवर देशातील अनेक कन्वेंशनमध्ये भाग घेऊन सिंधुदुर्गाचे नाव उज्वल केले आहे. आजवर झालेल्या पुणे, मुंबई, सुरत, हैदराबाद, सिकंदराबाद, बेंगलोर, दिल्ली अशा अनेक ठिकाणी या महोत्सवांना जाऊन तिथे आपली कला सादर करून महाराष्ट्राचे व आपल्या जिल्ह्याचे नाव रोशन केले.

 

Advertisement
Tags :
# tarun bharat news # tarun bharat news update # konkan update
Next Article