मॅजिक ऑरेंज, सेंट पॉल्स ब्लू, सेंट पॉल्स गोल्ड, विजयी
ग्रासरूट्स फुटबॉल लीग
बेळगाव : मॅजिक स्पोटींग फुटबॉल क्लब आयोजित सीजन 4 ग्रासरूट्स फुटबॉल लीगचे उद्घाटन दिवशी मॅजिक स्पोटिंग ऑरेंज, सेंट पॉल्स ब्लू, सेंट पॉल्स गोल्ड संघानी आपल्या प्रतिस्पर्धाक संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. सेंट पॉल्स हायस्कूलच्या मैदानावर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रणय शेट्टी, शशिकांत नायक, अभय पै, अक्षय कुलकर्णी, अल्पेश जैन, डॉ. बसवराज मोतीमठ आणि स्पर्धेचे आयोजक ऋषी बंग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावषी लीगने नवीन उंची गाठली आहे, बेळगाव आणि आसपासच्या भागातील 650 हून अधिक खेळाडूनी भाग घेतला व संघाना एकत्र आणले आहे. या स्पर्धेमध्ये 7 वयोगटांमध्ये 75 संघानी सहभाग घेतला आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना आयोजक म्हणले की बेळगावच्या तरुण फुटबॉलपटूं वाढण्यासाठी आणि मोठे स्वप्न पाहण्यासाठी आम्ही कायम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमचा दृष्टीकोन आहे.