For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मॅजिक ऑरेंज, सेंट पॉल्स ब्लू, सेंट पॉल्स गोल्ड, विजयी

10:31 AM Aug 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
मॅजिक ऑरेंज  सेंट पॉल्स ब्लू  सेंट पॉल्स गोल्ड  विजयी
Advertisement

ग्रासरूट्स फुटबॉल लीग

Advertisement

बेळगाव : मॅजिक स्पोटींग फुटबॉल क्लब आयोजित सीजन 4 ग्रासरूट्स फुटबॉल लीगचे उद्घाटन दिवशी मॅजिक स्पोटिंग ऑरेंज, सेंट पॉल्स ब्लू, सेंट पॉल्स गोल्ड संघानी आपल्या प्रतिस्पर्धाक संघाचा पराभव करून विजयी सलामी दिली. सेंट पॉल्स हायस्कूलच्या मैदानावर उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे प्रणय शेट्टी,  शशिकांत नायक, अभय पै, अक्षय कुलकर्णी, अल्पेश जैन, डॉ. बसवराज मोतीमठ आणि स्पर्धेचे आयोजक ऋषी बंग आदी मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावषी लीगने नवीन उंची गाठली आहे, बेळगाव आणि आसपासच्या भागातील 650 हून अधिक खेळाडूनी भाग घेतला व संघाना एकत्र आणले आहे. या स्पर्धेमध्ये 7 वयोगटांमध्ये 75 संघानी सहभाग घेतला आहे. उद्घाटनप्रसंगी बोलताना आयोजक म्हणले की बेळगावच्या तरुण फुटबॉलपटूं वाढण्यासाठी आणि मोठे स्वप्न पाहण्यासाठी आम्ही कायम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आमचा दृष्टीकोन आहे.

तळागाळातील फुटबॉल हा भारतीय फुटबॉलच्या भविष्याचा पाया आहे आणि प्रत्येक हंगामात तो पाया मजबूत करण्याचा उद्देश हा आमचा आहे. सन्माननीय पाहुण्यांनी या उपक्रमाचे व स्पर्धेकाचे कौतुक केले आणि तरुणांमध्ये शिस्त, सांघिक कार्य आणि निरोगी जीवनशैली घडवण्यात खेळाची महत्वची  भूमिका आहे असे ते म्हणाले. सोमवारच्या सामन्यात सेंट पॉल्स ब्लू ने मॅजिक स्पोटिंग हॅलो संघाला शून्य बरोबरच रोखले. या सामन्यात दोन्ही संघाना गोल करण्याच्या संधी मिळाल्या होत्या पण वाया गेल्याने गोल फलक कोराच राहिला. दुसऱ्या सामन्यात मॅजिक स्पोटिंग ऑरेंज संघाने बांगडी आयएस बी संघाचा 2-0 असा पराभव केला, तिसऱ्या सामन्यात सेंट पॉल्स ब्लू संघाने अंगडी आयएसओ संघाचा 7-0 असा पराभव केला. चौथ्या सामन्यात संतोषने गोल्ड संघाने मॅजिक स्पोर्टिंग ऑरेंज संघाचा 8-0 असा एकतर्फी पराभव केला.

Advertisement

Advertisement
Tags :

.