For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

हरमलात पावणे दोन कोटीचे ‘मॅजिक मशरुम्स’ जप्त

11:16 AM Mar 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
हरमलात पावणे दोन कोटीचे ‘मॅजिक मशरुम्स’ जप्त

‘मॅजिक मशरुम’ अमलीपदार्थाचा नवा प्रकार : एएनसीकडून रशियन नागरिकाला अटक,अलीकडची सर्वात मोठी कारवाई

Advertisement

पणजी : अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या अमलीपदार्थावरील कारवाईत अमलीपदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) मधलावाडा, हरमल येथे काल गुऊवारी केलेल्या कारवाईत 1 कोटी 69 लाख 47 हजार ऊपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले आहेत. या प्रकरणात एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करून त्याला न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव एव्हगेनी मोर्कोविन (वय 33) असून तो मूळ रशियन आहे.

पोलिसांनी ठेवली होती पाळत

Advertisement

गेल्या काही महिन्यांपासून तो हरमल येथे भाड्याच्या खोलीत राहत होता. एक रशियन नागरिक अमलीपदार्थांच्या व्यापारात गुंतला आहे. विशेषत: मॅजिक मशरूम म्हणून प्रसिद्ध असलेल्या सायलोसायबिन मशरूमचा तो पुरवठा करीत आहे, अशी माहिती एएनसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रशियन नागरिकाचा शोध लावला आणि त्याच्यावर पाळत ठेवण्यात आली.

Advertisement

रंगेहात आवळल्या मुसक्या

याविषयीची ठोस माहिती हाती लागताच एएनसीच्या पोलिसांनी मधलावाडा, हरमल येथे संशयित राहत असलेल्या भाड्याच्या जागेवर छापा टाकला आणि त्याला रंगेहात अटक केली.

झडतीदरम्यान सापडले ड्रग्जचे घबाड

झडतीदरम्यान पोलिसांनी 218 ग्रॅम सायलोसायबिन मशरूम  आणि 2 किलो गांजा, तसेच 7.9 किलो मशरूमच्या कळ्या, 150 नग सायलोसायबिन मशरूमचे बियाणी जप्त करण्यात आले असून संशयिताला अटक केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात 1 कोटी 69 लाख ,47 हजार इतकी किंमत आहे.

‘सायलोसायबिन मॅजिक मशरुम्स’ नवी पद्धत

या छाप्यादरम्यान एएनसीला असे आढळून आले की, हा रशियन नागरिक बंदी घातलेले अमली पदार्थच विकत  आहे. त्याने 7.93 किलोग्रॅम (1 कोटी 58 लाख ऊपये किमतीचे) प्रतिबंधित पदार्थ वाढवण्यासाठी असंख्य काचेच्या भांड्यांमध्ये सायलोसायबिन मशरूमच्या कळ्या देखील पेरल्या होत्या. पोलिसांनी सुमारे 150 मशरूमची बियाणी जप्त केली आहेत. याशिवाय आरोपीने सायकेडेलिक मशरूम पिकवण्यासाठी वापरलेली सिरिंज, काचेची भांडी, खास बनावटीचे प्लास्टिकचे डबे आणि इतर वस्तूही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. अलिकडच्या वर्षांत, मॅजिक मशरूममधील सायको-एक्टिव्ह घटक असलेल्या सायलोसायबिनची मागणी वाढत आहे, ज्यावर एनडीपीएस कायद्यानुसार बंदी आहे. सायलोसायबिन सारख्या सायकेडेलिक्सचा वापर अलिकडच्या वर्षांत वाढत आहे, विशेषत: तऊणांमध्ये सायलोसायबिन जो जादूई मशरूमचा एक घटक आहे, बदललेल्या विचारसरणीमुळे हा प्रकार सुरु आहे. एएनसी उपनिरीक्षक सुनील फाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा छापा टाकण्यात आला असून एएनसी निरीक्षक सजीथ पिल्लई यांच्या देखरेखीखाली कॉन्स्टेबल  नितेश मुळगावकर, लक्ष्मण म्हामल, संदेश वळवईकर, मंदार नाईक, मकरंद घाडी, महिला कॉन्स्टेबल वेल्सिया आणि पोलीस ड्रायव्हर कुंदन पाटेकर यांनी ही कारवाई केली. एएनसी उपअधीक्षक नेरलॉन अल्बुकर्क आणि  एएनसी  अधीक्षक बॉस्युएट सिल्वा यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन यामुळे छाप्याचे सतत निरीक्षण करण्यात येत होते. या प्रकरणाचा अधिक तपास उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक करीत आहेत.

Advertisement
Tags :
×

.