For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुख्तार अन्सारीला साडेपाच वर्षांची शिक्षा

06:14 AM Dec 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
मुख्तार अन्सारीला साडेपाच वर्षांची शिक्षा
Advertisement

रुंगटा खून प्रकरणातील साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी दोषी

Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी

माफिया डॉन मुख्तार अन्सारीच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे. महावीर प्रसाद रुंगटा यांना धमकावल्याप्रकरणी वाराणसीच्या खासदार-आमदार न्यायालयाने मुख्तार अन्सारी याला दोषी ठरवत साडेपाच वर्षांची शिक्षा सुनावली. तुरुंगवासासोबतच 10 हजार रुंपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. 1 डिसेंबर 1997 रोजी मुख्तार अन्सारीविऊद्ध भेलुपूर पोलीस ठाण्यात धमकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदकिशोर ऊंगटा यांच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी आरोपी बनवण्यात आलेल्या मुख्तार अन्सारीला 2000 मध्ये कनिष्ठ न्यायालयाने आपला निकाल देऊन निर्दोष मुक्त केले होते. योगी सरकार सत्तेत आल्यानंतर हे हायप्रोफाईल प्रकरण पुन्हा एकदा समोर आल्यानंतर या प्रकरणात ते दोषी ठरले होते.

Advertisement

महावीर प्रसाद ऊंगटा हे कोळसा व्यापारी नंदकिशोर ऊंगटा यांचे भाऊ आहेत. रवींद्रपुरी कॉलनीतील रहिवासी नंदकिशोर ऊंगटा यांचे 90 च्या दशकात अपहरण करून हत्या करण्यात आली होती. महावीर प्रसाद ऊंगटा यांनी वाराणसीच्या भेलुपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास सुरू असताना 5 नोव्हेंबर 1997 रोजी संध्याकाळी महावीर प्रसाद ऊंगटा यांना फोनवरून धमकी देण्यात आली. भावाला खटला चालवण्यापासून दूर राहण्यास सांगण्यात आले. तसे न केल्यास ठार मारण्याची धमकीही देण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.