महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मध्यप्रदेश, छत्तीसगडचा कौल ईव्हीएमबंद

06:58 AM Nov 18, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन्ही राज्यात 70 टक्क्यांच्या वर मतदान : आता 3 डिसेंबरला मतमोजणी

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ, रायपूर

Advertisement

मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमधील विधानसभा निवडणूक रिंगणातील उमेदवारांचे राजकीय भवितव्य शुक्रवारी ईव्हीएममध्ये बंद करण्यात आले. मध्यप्रदेशमध्ये 230 सदस्यांच्या विधानसभेसाठी शुक्रवारी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 71.16 टक्के मतदान झाले. तर, रात्री उशिरा जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार 75 टक्क्यांवर मतदान झाले आहे. दुसरीकडे, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात शुक्रवारी 70 मतदारसंघांत 70.12 टक्के (तात्पुरती) मतदानाची नोंद झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. मध्यप्रदेशात विधानसभेच्या 230 जागांवर 2,533 उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी मतदान झाले. तसेच छत्तीसगडमध्ये दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातील 70 जागांसाठी मतदान झाले. दोन्ही राज्यातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली असून आता 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

मध्यप्रदेशात विधानसभेच्या 230 जागांवर 2,533 उमेदवारांचे भवितव्य ठरवण्यासाठी मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. राज्यातील सर्व मतदारसंघात एकाच टप्प्यात मतदानासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली होती. मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. छत्तीसगडमध्ये मतदानाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आठ मंत्री आणि चार खासदारांसह 958 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला होणार आहे. या उमेदवारांमध्ये 827 पुऊष, 130 महिला आणि एक तृतीय पंथियाचा समावेश आहे.

मध्यप्रदेशमध्ये नक्षलग्रस्त बालाघाट, मांडला आणि दिंडोरी जिह्यात दुपारी 3 वाजता मतदान संपले, तर राज्याच्या इतर भागांत ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू होते. सर्व 230 मतदारसंघात सकाळी 7 वाजता मतदानाला सुऊवात झाली. बालाघाट जिह्यात, बैहार विधानसभा मतदारसंघात 80.38 टक्के, लांझी 75.07 टक्के आणि परसवाडा येथे 81.56 टक्के मतदान झाले. राज्यात भाजपचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष कमलनाथ यांच्यासह 2,533 उमेदवार रिंगणात आहेत. शुक्रवारी सकाळी 7 वाजता सुरू झालेले मतदान सायंकाळी 6 वाजता संपले. मात्र, सायंकाळी सहा वाजेपूर्वी मतदान केंद्रावर दाखल झालेल्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 71.16 टक्के मतदान झाल्याचे मध्यप्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) अनुपम राजन यांनी सांगितले.

आयटीबीपीचा जवान हुतात्मा

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीदरम्यान गरिआबंदच्या बिंद्रनवगढमध्ये नक्षलवाद्यांनी मतदान केंद्रावर हल्ला केला. यादरम्यान आयईडी स्फोटात आयटीबीपीचा एक जवान हुतात्मा झाला. तसेच अन्य एका घटनेत बालोदाबाजारमध्ये मतदानाच्या रांगेत उभ्या असलेल्या महिलेचा हृदयविकाराच्या झटक्मयाने मृत्यू झाला. तर, आपला हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राकडे जात असताना हत्तीच्या हल्ल्यात एका पुऊषाचा मृत्यू झाला. राज्यात पोलीस आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या दाट सुरक्षा व्यवस्थेखाली मतदान झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

छत्तीसगडमध्ये टक्का घसरला

छत्तीसगड निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 70 जागांसाठी 68.15 टक्के मतदान झाले. 70 मतदारसंघातील मतदान सकाळी 8 वाजता सुरू झाले आणि 5 वाजता संपले. यासंबंधीचा अंतिम आकडा शनिवारी निवडणूक आयोगाकडून जाहीर केला जाणार असून तो 70 टक्क्यांच्या वर जाण्याचे संकेत मिळत आहेत. यापूर्वीच्या म्हणजेच 2018 मधील निवडणुकीत राज्यात एकंदर 76.88 टक्के मतदानाची नोंद झाली होती. अर्थातच मागील निवडणुकीच्या तुलनेत आता मतदानाचा टक्का घसरल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. नक्षलग्रस्त राज्यातील 90 सदस्यीय विधानसभेच्या 20 जागांसाठी पहिल्या टप्प्यातील निवडणुका 7 नोव्हेंबर रोजी पार पडल्या असून त्यात 78 टक्क्यांहून अधिक मतदान झाले.

मुख्यमंत्री बघेल यांनी पाटण दुर्ग जिह्यातील कुऊद्दीह गावात, तर राज्यपाल विश्वभूषण हरिचंदन आणि त्यांच्या पत्नीने सिव्हिल लाइन्स रायपूरमध्ये मतदान केले. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी रीना बाबा साहेब कंगाळे यांनी राजधानीतील धरमपुरा येथील मतदान केंद्रावर मतदान केले. मतदानानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मुख्यमंत्री बघेल यांनी काँग्रेस 75 पेक्षा जास्त जागा जिंकेल असा दावा करतानाच पाटण विभागात एकतर्फी लढत असल्याचा विश्वास व्यक्त केला. राज्यात भाजप आणि काँग्रेस यांच्यात कडवी लढत होत आहे.

कमलनाथ यांच्या मुलाला बूथमध्ये जाण्यापासून रोखले

मध्यप्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांच्या मुलाला भाजप कार्यकर्त्यांनी बूथमध्ये जाण्यापासून रोखले. छिंदवाडा येथे गेल्या पोटनिवडणुकीत कमलनाथ यांना कडवी टक्कर देणारे भाजपचे विनय बंटी साहू पुन्हा एकदा भाजपचे उमेदवार आहेत. यावेळी भाजपचे विनय बंटी साहू यांच्याकडून कमलनाथ यांना चांगली लढत मिळू शकते, असे मानले जात आहे. आपण विधानसभा निवडणुकीत कमलनाथ यांना पन्नास हजारांहून अधिक मतांनी पराभूत करणार असल्याचा दावा विनय बंटी साहू यांनी केला.

मुरैना येथील दिमाणी मतदारसंघात तणाव

मुरैना येथील दिमाणी विधानसभा मतदारसंघात दोन गटात झालेल्या चकमकीनंतर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. मतदारसंघातील मिरघन गावात आणखी एक वाद झाला. मतदान करून परतणाऱ्या एका तऊणाला काठ्यांनी मारहाण करण्यात आली. तेथे दगडफेकीत दोघे जखमी झाले. त्यांना मतदान करण्यापासून रोखल्याचा आरोप जखमी तऊणांनी केला. दोन ठिकाणी घडलेल्या या संघर्षानंतर सुरक्षा कडक करण्यात आल्याचे मुरैनाचे पोलीस अधीक्षक शैलेंद्र सिंह यांनी सांगितले.

राज्यात परिवर्तनाची लाट : दिग्विजय सिंह

मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी राज्यात परिवर्तनाची लाट असल्याचा दावा केला. त्यांनी श्यामला हिल्स मतदान केंद्रावर मतदान केले. संपूर्ण राज्यात परिवर्तनाची लाट आहे. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसला 130 पेक्षा जास्त जागा मिळतील, असे ते म्हणाले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article