मध्यप्रदेश, चंडीगड, महाराष्ट्र, बिहार विजयी
वृत्तसंस्था / जालंधर (पंजाब)
2024 च्या हॉकी इंडियाच्या 14 व्या कनिष्ट पुरूषांच्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत पहिल्या दिवशी मध्यप्रदेश, चंदीगड, महाराष्ट्र, मणिपूर, बिहार आणि पंजाब यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजयी सलामी दिली.
पहिल्या सामन्यात मध्यप्रदेशने उत्तराखंडचा 9-1 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. मध्यप्रदेशतर्फे झमीर मोगमादने 2 गोल तर कर्णधार अली अहम्मद, तुषार परमार, अलीमाज खान, सोहील अली, पी. कार्तिकेय, सद्दाम अहम्मद व मोहम्मद अनास यांनी प्रत्येकी 1 गोल केला. उत्तराखंडतर्फे अर्पितकुमार कोहलीने 1 गोल नोंदविला.
दुसऱ्या सामन्यात चंदीगडने पुडुचेरीचा 9-2 असा फडशा पाडला. चंदीगडतर्फे हरप्रितसिंग, सुखप्रितसिंग आणि कोमलप्रितसिंग यांनी प्रत्येकी 2 गोल तर गुरुप्रितसिंग, गुरुकिरातसिंग ओथी, कर्णधार प्रभज्योतसिंग यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. पुडुचेरीतर्फे गुरुदत्त गुप्ता आणि अयोथीदासन् यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला.
तिसऱ्या सामन्यात महाराष्ट्राने हिमाचल प्रदेशवर 5-0 अशी मात केली. महाराष्ट्रातर्फे जोसेफ अॅन्थोनी डॉमिगो, जय काळे, कार्तिक पाठारे, अमिन प्रणव आणि सचिन राजगडे यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
चौथ्या सामन्यात मणिपूरने गोव्याचा 15-1 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव करत विजयी सलामी दिली. मणिपूरतर्फे युमखेम विद्यानंदसिंगने हॅट्ट्रिकसह 5 गोल केले. अमरजितसिंगने 3 गोल नोंदविले. एस. लिशामने 2 गोल केले. कर्णधार सुरेश शर्मा, एन. रोहित सिंग, आय.रोहित सिंग, गुरूमयुम शर्मा आणि उत्तमसिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला. अन्य एका सामन्यात बिहारने मिझोरामला 2-2 असे बरोबरीत रोखले. मिझोरामतर्फे लामा शानुने 2 गोल केले. तर बिहारतर्फे रंजन गोंड आणि अली अब्बास यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
पहिल्या दिवसातील शेवटच्या सामन्यात पंजाबने तेलंगणाचा 7-0 असा फडशा पाडला. पंजाबतर्फे सुखविंदरसिंग, कर्णधार उज्वलसिंग यांनी प्रत्येकी 2 तर जर्मनसिंग, हर्षदीपसिंग, जोबानप्रितसिंग यांनी प्रत्येकी 1 गोल केला.