For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नक्षलमुक्त राज्य ठरले मध्यप्रदेश

06:32 AM Dec 13, 2025 IST | Tarun Bharat Portal
नक्षलमुक्त राज्य ठरले मध्यप्रदेश
Advertisement

विकासाला मिळणार वेग : कालमर्यादेपूर्वीच गाठले उद्दिष्ट

Advertisement

वृत्तसंस्था/ भोपाळ

मध्यप्रदेश हे आता नक्षलवादमुक्त राज्य ठरले आहे. यासंबंधीची घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे. मध्यप्रदेश सरकारने ही कामगिरी निर्धारित मुदतीपूर्वीच प्राप्त केली आहे. राज्यातील नक्षलप्रभावित क्षेत्र बालाघाट येथे 11 डिसेंबर रोजी अखेरच्या दोन नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले, दीपक उइके आणि राहित यांनी मुख्यमंत्री यादव यांच्या व्हर्च्युअल उपस्थितीत आत्मसमर्पण पेले आणि याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी राज्याला पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित केले आहे.

Advertisement

13 डिसेंबर रोजी मोहन यादव सरकारला दोन वर्षे पूर्ण होणार असून त्यापूर्वीच राज्याने हे यश मिळविले आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याला नक्षलमुक्त करण्यासाठी 26 जानेवारी ही कालमर्यादा निश्चित केली हाती. परंतु हे उद्दिष्ट जवळपास दीड महिन्यांपूर्वीच गाठण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यानी देशाला 2026 साली नक्षलमुत करण्याचे लक्ष्य यापूर्वीच निश्चित केले असुन यासाठी मार्चपर्यंतचा कालावधी ठरविण्यात आला आहे. मध्यप्रदेशने याप्रकरणी इतर राज्यांच्या तुलनेत बाजी मारली आहे. मुख्यमंत्री यादव यांच्यानुसार एमएमसी झोनमध्ये मागील 42 दिवसांमध्ये 42 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडला नक्षलप्रभावित भागांच्या एमएमएसी झोन श्रेणीत सामील करण्यात आले ओह.

आत्मसमर्पण केलेल्या 42 नक्षलवाद्यांवर एकूण 7.75 कोटी रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होते आणि चालूवर्षी मध्यप्रदेशात राज्य पोलिसांनी 13 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण करविले आहे, तर 10 नक्षलवादी चकमकीत मारले गेले आहेत. मध्यप्रदेशातील बालाघाट, डिंडोरी आणि मंडला हे जिल्हे नक्षलप्रभावित होते, परंतु दीपक उइके आणि  रोहित यांच्या आत्मसमर्पणानंतर हे जिल्हे पूर्णपणे नक्षलमुक्त झाले आहेत.

बालाघाट हा मध्यप्रदेशचा जिल्हा महाराष्ट्रातील गोंदिया तर छत्तीसगडच्या राजनंदगाव जिल्ह्याला लागून आहे आणि हा पूर्ण भूभाग नक्षलवादी हिंसेने प्रभावित राहिला आहे. मध्यप्रदेशच्या या भागात नक्षलवाद्यांनी अनेक मोठे हल्ले घडवून आणले होते. परंतु हा भाग आता नक्षलमुक्त झाल्याने येथे विकासाला मोठा वेग मिळणार आहे.

Advertisement
Tags :

.