For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

हेरवाडकर हायस्कूलतर्फे ‘मधुव्रितम’ सांस्कृतिक महोत्सव

11:36 AM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
हेरवाडकर हायस्कूलतर्फे ‘मधुव्रितम’ सांस्कृतिक महोत्सव
Advertisement

विद्यार्थी जीवनात सांस्कृतिक कार्यक्रमांना महत्त्व : रामायण-महाभारतातील उदाहरणांद्वारे स्पष्ट 

Advertisement

बेळगाव : एम. व्ही. हेरवाडकर हायस्कूलच्यावतीने मधुव्रितम 2 के-2024 सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. प्रमुख पाहुणे म्हणून सीए नितीन निंबाळकर उपस्थित होते. संस्थेचे सदस्य राजेश शिवलकर, डॉ. अजित कुलकर्णी, पंकज शिवलकर, ज्ञानेश कलघटगी, अलका कुलकर्णी, लता शिवलकर, हेमांगी प्रभू, यशश्री देशपांडे, गायत्री गावडे, प्राचार्या शोभा कुलकर्णी व इतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. नितीन निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांना सांस्कृतिक कार्यक्रमांचे महत्त्व स्पष्ट केले. वक्तृत्व, एनसीसी, शिस्त, नियम याविषयी थोडक्यात माहिती करून दिली. या महोत्सवाचा शालेय जीवनामध्ये कशा पद्धतीने यांचा उपयोग होऊ शकतो हे रामायण, महाभारतातील उदाहरणांद्वारे त्यांनी स्पष्ट केले. या महोत्सवात शहरातील 12 हायस्कूलनी भाग घेतला होता. डी. पी. स्कूल, केएलएस स्कूल, डीपीएम स्कूल, गोमटेश हायस्कूल, बी. के. मॉडेल, जैन स्कूल, संत मीरा, प्रेसियस ब्लॉसम, सेंट जोसेफ, सेंट पॉल्स, जी. जी. चिटणीस हायस्कूल, कामधेनू स्कूल यांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्ष, श्रद्धा, तन्वी रायकर व शशिप्रिया यांनी केले. चिन्मय रेवणकर आणि श्रीवत्स जकाती यांनी आभार मानले.

Advertisement
Advertisement
Tags :

.