माधुरी पाटीलचे क्रीडा स्पर्धेत यश
11:59 AM Nov 07, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : चौथ्या राज्यस्तरीय मिनी ऑलिम्पिक स्पर्धेत 14 वर्षांखालील वयोगटात माधुरी पाटीलने 200 मी. व 400 मी.धावणे प्रकारात रौप्यपदके पटकाविली.सदर स्पर्धा बेंगळूर येथील कंठीरवा स्टेडियमवर घेण्यात आली. यामध्ये कर्नाटकातील सुमारे 100 स्पर्धकांनी भाग घेतला होता. बेळगांव जिह्याचे प्रतिनिधित्व करताना माधुरीने 2 रौप्य पदके मिळविली. माधुरी सध्या जी. बी. लिंगदली स्पोर्ट्स येथे सराव करत आहे. माधुरीला क्रीडा शिक्षक अल्लाबक्ष बेपारी व संजय लिंगदली व मनोहर येळ्ळूरकरचे मार्गदर्शन तर पालक गजानन पाटील यांचे तिला प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement
Advertisement