माधुरी पाटीलची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
10:21 AM Nov 22, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते बेंगळूर आणि हासन शिक्षण खाते यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या 14 वर्षाखालील राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेत माधुरी पाटीलने 400 मी. धावणे क्रीडा प्रकारात रौप्य पदक तर 200 मी. धावण्याच्या शर्यतीत कांस्य पदक मिळविले. हासनमध्ये झालेल्या स्पर्धेत बेळगाव जिह्याचे प्रतिनिधित्व करताना तिने 200 मी 400 मी मध्ये धावण्याच्या शर्यतीत ही दोन पदके मिळविल्याने तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत तिने 1.44 कालावधी घेतला. मध्येप्रदेश येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याचे ती प्रतिनिधत्व करीत आहे. माधुरीला क्रीडा शिक्षक अल्लाबक्ष बेपारी, संजय लिंगदली व मनोहर यल्लूरकर आणि तिचे पालक गजानन पाटील यांचेही तिला प्रोत्साहन लाभत आहे.
Advertisement
Advertisement