पीएसीसमोर अनुपस्थित राहिल्या माधवी बुच
बैठक स्थगित केल्याची वेणुगोपाल यांची माहिती
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
लोकलेखा समिती (पीएसी)कडून सेबीच्या समीक्षेसाठी गुरुवारी बोलाविण्यात आलेली बैठक स्थगित करण्यात आली आहे. सेबी प्रमुख माधवी बुच यांच्याकडून दिल्लीत पोहोचण्यास असमर्थता व्यक्त करण्यात आल्यावर हा निर्णय घेण्यात आला. समितीचे प्रमुख आणि काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी यासंबंधी माहिती दिली. सेबी प्रमुखाला गुरुवारी समीक्षेसाठी बोलाविले होते. समितीने याच्याशी संबंधित लोकांना नोटीस बजावली, प्रथम त्यांनी सूट मागितली. सेबी अध्यक्षांनी समितीसमोर उपस्थित राहण्यापासून सूट मागितली होती, ही मागणी अमान्य करण्यात आली होती. त्यानंतर बुच आणि त्यांच्या टीमने समितीसमोर उपस्थित राहणार असल्याचे कळविले होते. मग गुरुवारी सकाळी 9.30 वाजता दिल्लीसाठी प्रवास करण्याच्या स्थितीत नसल्याचे बुच यांच्याकडून कळविण्यात आले. एका महिलेकडून झालेल्या विनंतीच विचार करत आजची बैठक अन्य कुठल्याही दिवसापर्यंत स्थगित करणे योग्य ठरेल असा आम्ही विचार केल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले आहे.
बैठकीच्या अजेंड्यात संसदेच्या अधिनियमाने स्थापित नियामकीय शांखाच्या कामकाजाच्या समीक्षेसाठी समितीच्या निर्णयाच्या हिस्स्याच्या स्वरुपात अर्थ मंत्रालय आणि सेबीच्या प्रतिनिधींची तेंडी साक्ष सामील होती. नियामकीय शाखांच्या कामकाजाच्या समीक्षेला सामील करण्याच्या समितीच्या निर्णयाला कुठलाही विरोध झाला नव्हता असे वेणुगोपाल यांनी म्हटले आहे. बुच यांच्या विरोधात हिंडनबर्गने आरोप केले होते. ज्यानंतर काँग्रेसने सेबी प्रमुखांना लक्ष्य केले होते. तर समितीचे अध्यक्ष वेणुगोपाल हे केंद्र सरकारची बदनामी करणे आणि देशाच्या वित्तीय रचना आणि अर्थव्यवस्थेला अस्थिर करण्यासाठी निरर्थक मुद्दे उपस्थित करत असल्याचा आरोप पीएसीचे सदस्य निशिकांत दुबे यांनी केला होता. लोकलेखा समितीत भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षांच्या खासदारांचे बहुमत आहे. यामुळे बैठकीत विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांना त्यांच्याकडून विरोध केला जाऊ शकतो.