महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘मेड इन इंडिया’च्या स्मार्टफोनचा जगात दबदबा

07:00 AM May 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

देशाचा स्मार्टफोन बनला जगातील चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली  

Advertisement

जगभरात स्मार्टफोनची मागणी वाढत आहे. स्मार्टफोन आता भारतातील चौथ्या क्रमांकाची निर्यात वस्तू बनली आहे. भारतीय स्मार्टफोनची निर्यात वर्षाच्या आधारावर पाहता आर्थिक वर्ष 2024 मध्ये 42 टक्क्यांनी वाढून 15.6 अब्ज डॉलरची झाली आहे. भारताने एप्रिल 2022 पासून स्मार्टफोनसाठी स्वतंत्रपणे डेटा संकलित करण्यास सुरुवात केली. पेट्रोलियम उत्पादने भारतातील सर्वोच्च निर्यात वस्तू राहिल्या असताना, स्मार्टफोन आता मोटर गॅसोलीनला मागे टाकून आर्थिक वर्ष 2024 मध्ये चौथी सर्वात मोठी निर्यात वस्तू बनली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 2024 च्या आर्थिक वर्षात भारताची सर्वाधिक स्मार्टफोन निर्यात यूएस, संयुक्त अरब अमिराती, नेदरलँड्स आणि इंग्लंडमध्ये होती. अमेरिकेत स्मार्टफोनची निर्यात लक्षणीयरित्या 158 टक्क्यांनी वाढली आहे. एकूण 5.6 अब्ज डॉलर किमतीचे स्मार्टफोन भारतातून अमेरिकेत पाठवण्यात आले. भारतातून युनायटेड अरब अमिराती (2.6 अब्ज डॉलर), नेदरलँड्स (1.2 अब्ज), आणि युके (1.1 अब्ज) स्मार्टफोनची शिपमेंट झाली. सर्क्यूलर अॅण्ड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयसीइए) च्या अंदाजानुसार, आर्थिक वर्ष 2024 मध्ये निर्यात आणि देशांतर्गत दोन्ही बाजारांसाठी भारतात उत्पादित मोबाईल उपकरणांचे मूल्य 4.1 ट्रिलियन रुपये (49.16 अब्ज) पर्यंत वाढेल. वार्षिक उत्पादन 17 टक्क्यांनी वाढले आहे. आयसीइए देशातील बहुतेक मोबाइल कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते.

अॅपलची भारतात विक्रमी कमाई

अॅपलने मार्च 2024 ला संपलेल्या तिमाहीत भारतात विक्रमी कमाई केली. आयफोनच्या विक्रीत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 10 टक्के घट झाली असूनही एकूण महसुलात चार टक्के घट झाली आहे. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी ही माहिती दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article