महाराष्ट्र केसरीची गदा कुस्तीगीर परिषदेकडे सुपूर्त
औंध वार्ताहर
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा पाया घालणारे कुस्ती महर्षा कै मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दर वर्षा महाराष्ट्र केसरी साठी दिली जाणारी मानाची चांदीची गदा आज विधीवत पूजन करुन मामासाहेबांचे पुत्र माजी खासदार अशोकराव मोहोळ यांनी गदा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सचिव बाळासाहेब लांडगे सर यांच्याकडे दिली.
संग्रामदादा मोहोळ यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी माजी महापौर दिलीपभाऊ बराटे, बाबासाहेब कंधारे, शांताराम इंगवले, अमोल बराटे . महाराष्ट्र केसरी अमोल बुचडे . राजु मोहोळ, ललित लांडगे,पंकज हारपुडे,प्रकाश मोरे,कुणाल मोहोळ, विक्रम मोहोळ,अनिकेत जाधव, विजय मोहोळ, मनोज साठे उपस्थित होते.
१६ ते २०नोव्हेंबर या दरम्यान धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम च्या मैदानावर ६५ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धसाठी मोहोळ कुटुंबीयांनी हि चांदीची गदा तयार करुन घेतली आहे.६ डिसेंबर १९८२रोजी मामासाहेबांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ १९८३पासून अशोकराव मोहोळ यांनी ही चांदीची गदा देण्याचा उपक्रम सुरु केला आहे.
कशी असते महाराष्ट्र केसरीची गदा
गदेची उंची २९ते ३५ इंच असते.व्यास -११ते १३ इंच असून वजन 13ते १५किलो आहे.अंतर्गत धातू -सागवानी लाकडावर कोरीव काम करण्यात येते.बाह्य धातू -३८गेज जाड शुध्द चांदीचा पत्रा त्यावर कोरीव काम करुन झळाळी देण्यात येते.गदेच्या बाह्यभागावर-मध्यभागी मामासाहेब मोहोळ यांची वर्तुळाकृती प्रतिमा चांदीच्या कोंदणात बसवलेली असते.पानघंटी घराण्याचे वारसदार प्रदीप प्रतापराव पानघंटी महाराष्ट्र केसरी साठी देखणी गदा दरवर्षी बनवतात.चंद्रकांत मोहोळ यांनी आभार केले.