आरसीयूमध्ये एम.ए.मराठी प्रवेश प्रक्रिया सुरू
बेळगाव : येथील राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागात एम. ए. करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 27 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची शेवटची तारीख 19 जुलै आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश फॉर्म भरण्याचे आवाहन मराठी विभागामार्फत करण्यात येत आहे. मराठी विभाग राणी पार्वतीदेवी (आरपीडी) या शहरातील नामांकित महाविद्यालयात कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. प्रवेश पात्रता कोणत्याही विद्यापीठाची पदवी (बीए., बीकॉम., बी.एस्सी., बीबीए, बीसीए) पदवी प्राप्त असणारे विद्यार्थी प्रवेशासाठी अर्ज करू शकतात. विशेष सवलत एम. ए. मराठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी फक्त पाच हजार रुपये आहे. शिवाय एस. सी., एस. टी. विद्यार्थ्यांना फी फक्त एक हजार नऊशे रुपये आहे. सोबत त्यांना विद्यापीठाकडून मोफत लॅपटॉप देण्यात येतो.
मराठी विभागाची अद्ययावत वैशिष्ट्यो
समाजाच्या विविध स्तरातील घटकांचा विचार करून सदर अभ्यासक्रमाची निर्मिती केलेली आहे. एम. ए. (मराठी) च्या विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षा सेट-नेट/ यूपीएससी/ केपीएससी/ एमपीएससी इत्यादीसाठी उपयुक्त अभ्यासक्रम. व्यक्तिमत्त्व विकास, रोजगार/ व्यवसाय आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम डोळ्यासमोर ठेवून तयार पेलेला अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. सदर अभ्यासक्रम वृत्तपत्र क्षेत्र, आकाशवाणी, दूरदर्शन, प्रकाशन व्यवसाय या क्षेत्रात चांगली संधी प्राप्त करून देणारा आहे.
भाषांतर कला, अनुवाद कला, विपणन, मुद्रितशोधन, जाहिरात कला आदी क्षेत्रात संधी निर्माण करून देणारा अभ्यासक्रम आहे. राज्य व केंद्र सरकारच्या विविध खात्यात नोकरीची संधी निर्माण करून देणारा हा अभ्यासक्रम असून पर्यावरण, पुरातत्त्व खाते, प्राचीन शिलालेख व ऐतिहासिक माहितीसाठी उपयुक्त आहे. विद्यार्थ्यांची निकोप विचारसरणी घडविण्यासाठी समीक्षा, संशोधन, सृजनशील लेखन यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.
सदर अभ्यासक्रम व्यवसायाभिमुख व रोजगाराची संधी निर्माण करून देणारा आहे. विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडवून आणणारा असा अभ्यासक्रम असून तो प्रत्यक्ष अनुभव, प्रात्यक्षिके, शैक्षणिक सहली या उपक्रमांना प्राधान्य देणारा आहे. एम. ए. (मराठी) नंतर पीएचडीसाठी प्रवेश घेण्याची संधी, शिवाय विद्यापीठाकडून शिष्यवेतन दिले जाते. एम. ए. (मराठी) साठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. मनीषा नेसरकर -9900484161, प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे -9480539762, डॉ. संजय कांबळे -9164358489, सूर्यकांत मुगळी- 8660294004 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.