For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एम. व्यंकय्या नायडू, चिरंजीवी पद्मविभूषण

11:05 AM Jan 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
एम  व्यंकय्या नायडू  चिरंजीवी पद्मविभूषण
Advertisement

पद्म पुरस्कारांची केंद्र सरकारकडून घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

केंद्र सरकारने 25 जानेवारी 2024 रोजी जाहीर केलेल्या पद्मविभूषण, भूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेत्यांमध्ये देशातील दिग्गजांचा समावेश आहे. एकूण 132 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यात पाच पद्म विभूषण, 17 पद्म भूषण आणि 110 जणांना पद्मश्री विजेत्यांचा समावेश आहे. माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांच्यासह तामिळनाडूमधील वैजयंतीमाला बाली, आंध्रप्रदेशमधील सुप्रसिद्ध अभिनेते आणि दक्षिणेतील सुपरस्टार कोनीदेला चिरंजीवी, बिहारमधील सामाजिक कार्यकर्ते बिंदेश्वर पाठक (मरणोत्तर), तामिळनाडूतील कलाकार पद्मा सुब्रम्हण्यम अशा पाचजणांना पद्मविभूषण जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील होर्मूसजी कामा, अश्विनी मेहता, राम नाईक, दत्तात्रय अंबादास मायलू उर्फ राजदत्त, पॅरेलाल शर्मा कुंदन व्यास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे. तर कर्नाटकातील सीताराम जिंदाल यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील उत्कृष्ट कामाबद्दल पद्मभूषण प्राप्त झाला आहे. गोव्यातील संजय अनंत पाटील यांना कृषी क्षेत्रातील योगदानाबाबत पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

Advertisement

पद्मश्री  पुरस्कार प्राप्त

महाराष्ट्र : उदय विश्वनाथ देशपांडे (क्रीडा), मनोहर डोळे (वैद्यकीय), झाकीर काजी (साहित्य आणि शिक्षण), चंद्रशेखर मेश्राम (वैद्यकीय), कल्पना मोरपारीया (व्यापार आणि उद्योग), शंकर बाबा पापलकर (सामाजिक कार्य) कर्नाटक : रोहन बोपण्णा (क्रीडा), अनुपमा होसकेरे (कला), श्रीधर कृष्णमूर्ती (साहित्य आणि शिक्षण), के. एस. राजण्णा (सामाजिक कार्य), चंद्रशेखर राजण्णाचर (वैद्यकीय), सोमण्णा (सामाजिक कार्य), शशी सोनी (व्यापार आणि उद्योग), जळीतग्रस्तांसाठी काम करणाऱ्या प्लास्टिक सर्जन प्रेमा धनराज आणि म्हैसूर येथील आदिवासी कल्याण कार्यकर्ते सोमण्णा या कर्नाटकातील दोघांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. सोमण्णा हे जेनू कुऊब जमातीच्या विकासासाठी 4 दशकांहून अधिक काळ अथक कार्य करत आहे. तसेच भारतातील पहिल्या सिकलसेल अॅनिमिया नियंत्रण कार्यक्रमाचे विकासक याझदी मानेक्शा इटालिया, पहिली महिला हत्ती माहुत पार्वती बऊआ, आदिवासी पर्यावरणवादी चामी मुर्मू, मिझोराममधील सामाजिक कार्यकर्त्या संघथनकिमा, महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय मल्लखांब प्रशिक्षक उदय विश्वनाथ देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

भारतरत्ननंतर भारतातील दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची घोषणा प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला  करण्यात आली. 1954 पासून सुरू करण्यात आलेले हे पुरस्कार विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, सामाजिक कार्य, विज्ञान, अभियांत्रिकी, सार्वजनिक व्यवहार, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग अशा विविध श्रेणींचा यात समावेश होतो. पद्मश्री पुरस्कार विजेत्यांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात पार्वती बऊआ, जागेश्वर यादव, चामी मुर्मू, गुरविंदर सिंग, सत्यनारायण बेलेरी, संगथनकिमा, हेमचंद मांझी, दुखू माझी, के चेल्लम्मल, यानुंग जामोह लेगो, सोमण्णा, सर्वेश्वर बसुमातारी, प्रेमा धनराज, उदय विश्वनाथ देशपांडे, शनविदिया, देशपांडे, याझदी मानेक्शा इटालिया, शांतीदेवी पासवान आणि शिवन पासवान, रतन कहार, अशोक कुमार बिस्वास, बालकृष्णन सदनम पुथिया वीटिल, उमा माहेश्वरी डी, गोपीनाथ स्वेन, स्मृती रेखा चकमा, ओमप्रकाश शर्मा, नारायणन ईपी, भागवत पधान, सनातन ऊद्र पाल, बद्रप्पन एम, जॉर्डन लेपचा, मच्छिहन सासा, गद्दम सम्मैया, जानकीलाल, दसरी कोंडप्पा, बाबू राम यादव आदींचा समावेश आहे.

शौर्य पुरस्कारांचीही घोषणा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सशस्त्र दलाच्या 80 जवानांना शौर्य पुरस्कार मंजूर केले. यापैकी 12 सुरक्षा कर्मचाऱ्यांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 6 सुरक्षा कर्मचाऱ्यांना कीर्ती चक्र प्रदान केले जाईल, त्यापैकी 3 जवानांना हे पदक मरणोत्तर दिले जाईल. याशिवाय 16 सुरक्षा कर्मचाऱ्यांना शौर्यचक्र प्रदान करण्यात येणार असून त्यापैकी 2 सुरक्षा कर्मचाऱ्यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 53 जवानांना लष्करी पदके प्रदान केली जातील. यापैकी 7 जणांना मरणोत्तर पदके दिली जाणार आहेत. पंजाब रेजिमेंटच्या आर्मी मेडिकल कॉर्प्सच्या 26 व्या बटालियनचे पॅप्टन अंशुमन सिंग, 9 पॅरा स्पेशल फोर्स युनिटचे हवालदार अब्दुल मजीद आणि 55 राष्ट्रीय रायफल्सचे (ग्रेनेडियर्स) शिपाई पवन कुमार यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात येणार आहे.

Advertisement
Tags :

.