For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम. फातिमा बीवी यांचे निधन

05:46 PM Nov 23, 2023 IST | Kalyani Amanagi
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश एम  फातिमा बीवी यांचे निधन
Advertisement

Advertisement

सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला न्यायाधीश न्यायमूर्ती एम. फातिमा बीवी यांचे आज (गुरुवार) वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झाले.
गुरुवारी एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

केरळमधील पंडालम येथे बीवी यांनी तिरुअनंतपुरमच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून विज्ञान शाखेची पदवी मिळवली होती. त्यांचे शालेय शिक्षण हे पथनामथिट्टा येथील कॅथलिक हायस्कूलमध्ये पूर्ण झाले.पुढे त्यांनी सरकारी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी प्राप्त केली आणि १४ नोव्हेंबर १९५० रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी १९५० मध्ये केरळच्या खालच्या न्यायपालिकेत आपली कारकीर्द सुरू केली. यानंतर १९८३मध्ये त्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश आणि १९८९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बनल्या.

Advertisement

कोणत्याही उच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश होत्या. निवृत्तीनंतर तामिळनाडूचे राज्यपाल म्हणून नियुक्त होण्यापूर्वी त्यांनी प्रथम राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून काम केले. राज्यपालपदाच्या कार्यकाळात त्यांनी तामिळनाडू विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणूनही काम केले. १९९० मध्ये त्यांना डी.लिट आणि महिला शिरोमणी सारखे सन्माननीय पुरस्कार मिळाले. त्यांना भारत ज्योती पुरस्कार आणि यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिल (USIBC) जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.

Advertisement
Tags :

.