For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

म.ए.समिती महिला आघाडीचा मेळावा उत्साहात

10:41 AM Feb 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
म ए समिती महिला आघाडीचा मेळावा उत्साहात
Advertisement

बेळगाव : म. ए. समिती महिला आघाडीचा महिला मेळावा व तिळगुळ समारंभ मराठा बँकेच्या सभागृहात नुकताच पार पडला. प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. मंजुषा गिजरे उपस्थित होत्या. व्यासपीठावर महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, सचिव सरिता पाटील, उपाध्यक्षा सुधा भातकांडे उपस्थित होत्या. प्रारंभी नंदिनी दामले आणि सहकाऱ्यांनी इशस्तवन सादर केले. त्यानंतर साई ग्रुपतर्फे स्वागतगीत सादर करण्यात आले. पाहुण्यांच्या हस्ते फोटोपूजन व दीपप्रज्वलन झाल्यानंतर रेणू किल्लेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. अर्चना देसाई यांनी डॉ. ग्रीष्मा कुलकर्णी यांचा परिचय करून दिला. पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर मराठा बँकेच्या व्हाईस चेअरपर्सन नीना काकतकर यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉ. मंजुषा यांनी पीसीओडी व डॉ. ग्रीष्मा कुलकर्णी यांनी आयव्हीएफबाबत मार्गदर्शन केले. यानंतर विविध खेळ घेण्यात आले. ग्रुप गेममध्ये बापट गल्ली येथील शिवानी ग्रुपने तर होम मिनिस्टरमध्ये तेजस्वी हंडे यांनी बक्षिसे मिळविली. सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले. यानंतर सर्व महिलांना वाण देण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.