रस्त्याच्या मधोमध लक्झरी हॉटेल
ऑक्सेफार्डच्या बिझी सेंट जिल्स रोडच्या मधोमध असलेले एक लक्झरी हॉटेल सध्या चर्चेत आहे. दोन खोल्यांच्या या हॉटेलमध्ये एक रात्र वास्तव्यासाठी 20 हजार रुपयांपर्यंत खर्च करावे लागू शकतात. परंतु या हॉटेलशी निगडित एक जुने रहस्य देखील आहे. सध्या हॉटेल असलेले हे ठिकाण कधीकाळी पब्लिक टॉयलेट होते. हे हॉटेल 100 वर्षांपूर्वी एक पब्लिक टॉयलेट होते. हे हॉटेल रस्त्याच्या मधोमध निर्माण करण्यात आले आहे. रस्त्यावरून खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत, यानंतर तेथे दोन खोल्या दिसून येतील.
या हॉटेलचे नाव ‘द नेटी’ असून हे एक कोजी बुटिक हॉटेल असून ते रस्त्याखाली आहे. 100 वर्षांपेक्षा जुनी ही संरचना 1895 मध्ये इंग्लंडच्या क्वीन विक्टोरियाच्या शासनकाळात निर्माण करण्यात आली होती. तेव्हा हे केवळ जेंटलमसाठी पब्लिक टॉयलेटच्या स्वरुपात निर्माण करण्यात आले होते. 2008 पर्यंत हे स्वरुप कायम राहिले. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव त्याला बंद करण्यात आले. 11 वर्षांपर्यंत ही जागा अशीच रिकामी राहिली. मग मालकाने याला नवे रुप देण्याचा विचार केला आणि यानंतर हे अनोखे बुटीक हॉटेल झाले. हे ऑक्सफोर्डच्या सर्वात युनिक स्टे प्लेसपैकी एक आहे. याचे एका रात्रीसाठीचे भाडे सुमारे 20 हजार रुपये (200 पाउंड) आहे. परंतु येथे बुकिंग नेहमी फुल असते.
खोली मिळणे अवघड
या ठिकाणी येणारे लोक इतिहासात हरवून जातात. विक्टोरियन काळात शहरांमध्ये सार्वजनिक सुविधा वाढत होत्या. ऑक्सफोर्डसारख्या शैक्षणिक केंद्रात पुरुष खासकरून विद्यार्थी आणि प्राध्यापकांसाठी भूमिगत टॉयलेट्स निर्माण करण्यात आले होते,. या हॉटेल कम पब्लिक टॉयलेटमध्ये आयर्न रेलिंग्स, सिरॅमिक टाइल्सयुक्त क्लाकि डिझाइन तयार करण्यात आले होते. याला नेटी नाव मिळाले होते, जे ब्रिटिश स्लँगमधून आले आहे. 2008 मध्ये स्ट्रक्चरल मुद्द्यांमुळे हे बंद करण्यात आले. यानंतर 2019 मध्ये नुतनीकरण करण्यात आले. यात जुन्या टाइल्स, फिक्सचर्स वाचविण्यात आले, परंतु लक्झरी टच देण्यात आला. खोल्यांमदये किंग साइज बेड, रेन शॉवर, मिनी बार, वाय-फार, विंटेज डेकोर करण्यात आला. हॉटेलचे मॅनेजर एना पिन्हेइरो यांच्यानुसार हे सर्वांसाठी नवे नाही. अनेक लोकांना हे हॉटेल अजब वाटते. परंतु इतिहास आणि युनिकनेस पसंत असलेले लोक येथे रमतात.