For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खानापूर तालुक्यात लम्पी प्रतिबंधक मोहीम तीव्र

10:24 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
खानापूर तालुक्यात लम्पी प्रतिबंधक मोहीम तीव्र
Advertisement

आतापर्यंत 8 हजार जनावरांचे लसीकरण : पशुपालकांनी जनावरांना लसीकरण करून घेण्याचे पशु वैद्याधिकाऱ्यांचे आवाहन

Advertisement

खानापूर : खानापूर पशुसंगोपन खात्यामार्फत लम्पी संसर्गजन्य रोगाला आळा घालण्यासाठी 20 जून ते 20 जुलै दरम्यान प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तालुक्यातील सर्व गो वर्गीय जनावरांना मोफत लस टोचली जात आहे. गेल्या दोन वर्षांपासून सर्वत्र लम्पी रोगाने थैमान घातले होते. या पार्श्वभूमीवर यावर्षी जून महिन्यातच ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. लम्पी रोगाने जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक वाढत असल्याने पशुपालकांना मोठा फटका सहन करावा लागला होता. लम्पि रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने जनावरांचा आठवडी बाजारही बंद करण्यात आला होता. त्यामुळे आर्थिक फटका सहन करावा लागला होता. यासाठी खबरदारी म्हणून यावर्षी लवकरच रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. या अंतर्गत तालुक्यातील सर्व जनावरांना ही लस दिली जाणार आहे. विशेषत: गो-वर्गीय जनावरांना या रोगाची लागण अधिक होते. या पार्श्वभूमीवर गो-वर्गीय जनावरांना ही लस दिली जात आहे. अलीकडे जनावरांना वेगवेगळ्dया रोगांची लागण होऊ लागली आहे. त्यामुळे खात्यामार्फत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवून जनावरांना रोगापासून दूर ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

तालुक्यात 40 हजारावर जनावरे

Advertisement

तालुक्यातील एकूण 15 पशु चिकित्सालय केंद्रातून लसीकरण करण्यात येणार आहे. तालुक्यातील 40 हजार 135 गो-वर्गीय जनावरांची संख्या आहे. अशा गाय, बैल आणि त्यांच्या वासरांना ही लस दिली जात आहे. याबाबत लसीकरणाचा पुरवठाही सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांत करण्यात आला आहे. कोठेही लसीकरणाचा तुटवडा निर्माण होणार नाही. तालुक्यात 25 जूनअखेर 8 हजारहून अधिक जनावरांना लस देण्यात आली आहे. तरी तालुक्यातील पशुपालकांनी  गो-वर्गीय जनावरांना लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंगोपन खात्याचे सहाय्यक संचालक डॉ. ए. एस. कोडगी यांनी केले आहे.

Advertisement
Tags :

.