महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘लकी भास्कर’चा ट्रेलर प्रदर्शित

07:00 AM Oct 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बँकरच्या भूमिकेत दुलकर सलमान

Advertisement

दक्षिण भारतीय अभिनेता दुलकर सलमानचा आगामी चित्रपट ‘लकी भास्कर’चा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्रेलरने चाहत्यांची उत्सुकता आणखीच वाढविली आहे. अभिनेत्याने स्वत:च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकौंटवर ट्रेलरचा व्हिडिओ शेअर केला आहे. ‘लकी भास्करचा उदय, जोखीम आणि मोहक प्रवासाची एक झलक’ अशी कॅप्शन त्याने जोडली आहे. सलमान यात भास्कर ही व्यक्तिरेखा साकारत असून तो बँकर आहे. भास्करला नीरस जीवन जगताना दाखविण्यात आले असून अचानक त्याच्या जीवनात सर्वकाही बदलून जाते. त्याला एक मोठी रक्कम मिळत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते. 1980 च्या दशकाच्या अखेरचा काळ दाखविणारा हा चित्रपट एक साधारण बँक कॅशियर, लकी भास्करचे रंजक, अशांक आणि असाधारण जीवन प्रवास दर्शविणारा आहे. दुलकर सलमानचा हा बहुप्रतीक्षित चित्रपट 31 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन वेंकी एटलुरी यांनी केले आहे. त्यांनी मागील चित्रपटासाठी प्रेक्षक आणि समीक्षकांकडून प्रशंसा मिळविली होती.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article