कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘आरसीबी’समोर आज लखनौचे आव्हान

06:56 AM May 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

अव्वल दोन स्थानांसाठी प्रयत्नशील रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर संघ आज मंगळवारी येथे लखनौ सुपर जायंट्सविऊद्धच्या त्यांच्या शेवटच्या लीग सामन्यात सावधगिरी बाळगेल. कारण यजमान संघ मोठ्या प्रमाणात विस्मरणीय अशा मोहिमेनंतर सकारात्मक पद्धतीने मोहीम संपुष्टात आणण्यास उत्सुक असेल.

Advertisement

गुजरात टायटन्सच्या सलग दोन पराभवांमुळे तिसऱ्या स्थानावर असलेल्या आरसीबीला 2016 नंतर प्रथमच अव्वल दोनमध्ये स्थान मिळवण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. शीर्ष दोन संघ क्वालिफायर-1 खेळतील, ज्यातील विजेता अंतिम फेरीत प्रवेश करेल आणि पराभूत संघ क्वालिफायर-2 मध्ये जाऊन तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावरील संघांदरम्यानच्या एलिमिनेटरच्या विजेत्याशी सामना खेळेल. आरसीबीचे सध्या 17 गुण झालेले आहेत.

मुंबई इंडियन्स (16 गुण) किंवा पंजाब किंग्स (17 गुण) यापैकी एकटा गुजरातला (18 गुण) मागे टाकणार असल्याने आरसीबीला विजय अत्यावश्यक आहे. भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षामुळे लीगच्या वाटचालीत 10 दिवसांचा खंड पडण्यापूर्वी आरसीबी जबरदस्त फॉर्ममध्ये होता. त्यांनी सलग चार सामने जिंकले होते. परंतु खंडामुळे त्यांचा वेग बिघडला आहे असे दिसते. पुन्हा लीग सुरू झाल्यापासून बेंगळूरचा एक सामना पावसामुळे रद्द झाला आणि नंतर सनरायझर्स हैदराबादकडून 42 धावांनी त्यांना पराभव पत्करावा लागला.

आरसीबीचा शेवटचा विजय 3 मे रोजी नोंदला गेला होता आणि हैदराबादविरुद्ध त्यांना आलेली मरगळ स्पष्ट दिसत होती. अस्थायी कर्णधार जितेश शर्मानेही त्या पराभवानंतर ते कबूल केले. मात्र ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडच्या पुनरागमनाने आरसीबीच्या छावणीत उत्साह वाढला आहे. हेझलवूड या हंगामात संघाचा उत्कृष्ट कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे. त्याने 10 सामन्यांमध्ये 18 बळी घेतले आहेत आणि सध्या तो स्पर्धेतील आघाडीच्या बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. आरसीबीला एकाना स्टेडियमवर त्यांचा शेवटचा सामना खेळतना परिस्थितीची जाणीव असेल. तथापि, लखनौ सुपर जायंट्सवर मात करणे सोपे जाणार नाही.

गेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा पराभव केल्यानंतर यजमान संघ आत्मविश्वासाने भरलेला आहे. या हंगामात संघासाठी मोठे योगदान दिलेल्या एडन मार्करम, मिशेल मार्श आणि निकोलस पूरन या परदेशी त्रिकुटाने गुजरातच्या गोलंदाजीला उद्धवस्त केले आणि 2 बाद 235 धावा केल्या. त्यांच्या गोलंदाजी विभागानेही त्या सामन्यात प्रभावित केले आणि दुखापतींनी सतावले नसते, तर त्यांची मोहीम कशी राहिली असती त्याची झलक दाखवली. जखमी मयंक यादवच्या जागी करारबद्ध झालेल्या विल ओ’रोर्कची भर घालणे ही एक सकारात्मक चाल ठरली आहे. एलएसजीचा फॉर्मात असलेला फिरकीपटू दिग्वेश राठी देखील एका सामन्याच्या निलंबनाची शिक्षा भोगल्यानंतर आजच्या सामन्यासाठी उपलब्ध असेल. पण लखनौला या हंगामात सातत्याच्या अभावाने त्रास दिला आहे आणि कर्णधार रिषभ पंतनेही ते मान्य केले आहे.

संघ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : रजत पाटीदार (कर्णधार), फिल सॉल्ट, विराट कोहली, मयंक अग्रवाल, जितेश शर्मा, टिम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेझलवूड, यश दयाल, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, जेकब बेथेल, स्वप्नील सिंग, लियाम लिव्हिंगस्टोन, नुवान तुषारा, लुंगी एनगिडी, मोहित राठी, स्वस्तिक चिकारा, अभिनंदन सिंग.

लखनौ सुपर जायंट्स : रिषभ पंत (कर्णधार), एडन मार्करम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, अब्दुल समद, डेव्हिड मिलर, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्वेश राठी, रवी बिश्नोई, प्रिन्स यादव, शाहबाज अहमद, मॅथ्यू ब्रेट्झके, हिंमत सिंग, शामर जोसेफ, मणिमरन सिद्धार्थ, आर्यन जुयाल, आर. एस. हंगरगेकर, युवराज चौधरी, आकाश महाराज सिंग, अर्शिन कुलकर्णी.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7:30 वा.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article