For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लखनौला आज पंजाबविरुद्ध सुधारित कामगिरीची गरज

06:57 AM Mar 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
लखनौला आज पंजाबविरुद्ध सुधारित कामगिरीची गरज
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

लखनौ सुपर जायंट्स आज शनिवारी येथे होणाऱ्या त्यांच्या इंडियन प्रीमियर लीगमधील दुसऱ्या सामन्यात पंजाब किंग्जचा सामना करणार असून यावेळी आपल्या विविध विभागांतील कामगिरीत सुधारणा करण्याचे लक्ष्य त्यांच्याकडून बाळगले जाईल. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखालील एलएसजी राजस्थान रॉयल्सविऊद्धच्या पहिल्या सामन्यात चंदिगडमध्ये 20 धावांनी पराभूत झाला. कृणाल पंड्या वगळता एलएसजीचे सर्व गोलंदाज महागडे ठरले आहेत आणि निष्प्रभही दिसले आहेत.

मार्क वूड आणि डेव्हिड विली यांच्या अनुपस्थितीत मोहसीन खान, नवीन-उल-हक आणि यश ठाकूर यासारख्या गोलंदाजांवर अवलंबून असलेला एलएसजीचा वेगवान मारा हा फारसा प्रभावी दिसत नाही. आगामी टी-20 विश्वचषकासाठीच्या संघात स्थान मिळविण्याच्या शर्यतीत असलेला रवी बिश्नोई देखील संघाच्या सलामीच्या सामन्यात सामान्य दिसला. कर्णधार राहुल, ज्याने टी-20 विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून यष्टिरक्षक-फलंदाजाची भूमिका निभावण्याचा निर्णय घेतला आहे, त्याने आपल्या पुनरागमनाच्या सामन्यात 58 धावा केल्या आणि तो त्यावर आणखी मोठ्या डावाची उभारणी करू पाहेल. रॉयल्सविऊद्ध संधी हुकल्यानंतर त्याचा सलामीचा जोडीदार क्विंटन डी कॉक पंजाबविऊद्ध तरी फार्मात येईल अशी राहुलला आशा असेल. याशिवाय संघाच्या दृष्टीने देवदत्त पडिक्कल, आयुष बडोनी, दीपक हुडा आणि कृणाल हेही चमकणे गरजेचे आहे. ‘एलएसजी’चे यश ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू मार्कस स्टॉइनिसच्या फॉर्मवर देखील अवलंबून आहे. तो गेल्या वर्षी 408 धावांसह संघाचा सर्वांत जास्त धावा करणारा खेळाडू ठरला होता.

Advertisement

दुसरीकडे, पंजाब किंग्स आतापर्यंत एक सामना जिंकले आहेत, तर एक हरले आहेत. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील संघाला पॉवरप्लेमध्ये अधिक प्रभाव दाखविण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी पहिल्या दोन सामन्यांत अपयशी ठरलेल्या जॉन बेअरस्टोला चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. शिखर धवनलाही त्याचा स्ट्राईक रेट वाढवावा लागेल. गेल्या मोसमात चमक दाखविलेला प्रभसिमरन सिंग अद्याप त्याच्या सुऊवातीचा फायदा घेऊ शकलेला नाही.

अष्टपैलू सॅम करनने दोन सामन्यांमध्ये फलंदाजीत आपले पराक्रम दाखवले, पण गोलंदाजीत तो दिशाहीन राहिलेला आहे. विश्वचषकासाठीच्या शर्यतीत असलेल्या उपकर्णधार जितेश शर्माने निवड समितीवर छाप पाडण्यासाठी चांगली कामगिरी करून दाखविणे गरजेचे आहे. वेगवान गोलंदाजीमध्ये कागिसो रबाडाला करन, अर्शदीप सिंग आणि हर्षल पटेल यांच्याकडून अधिक मदतीची अपेक्षा असेल. डावखुरा फिरकीपटू हरप्रीत ब्रार प्रभावी ठरलेला आहे, तर लेगस्पिनर राहुल चहरने आपली गोलंदाजी आणखी परिणामकारक बनविणे आवश्यक आहे.

संघ : लखनौ सुपर जायंट्स : के. एल. राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, काइल मेयर्स, मार्कस स्टॉइनिस, दीपक हुडा, देवदत्त पडिकल, रवी बिश्नोई, नवीन-उल-हक, कृणाल पंड्या, युधवीर सिंग, प्रेरक मंकड, यश ठाकूर, अमित मिश्रा, शामर जोसेफ, मयंक यादव, मोहसीन खान, के. गौतम, शिवम मावी, अर्शिन कुलकर्णी, एम. सिद्धार्थ, अॅश्टन टर्नर, डेव्हिड विली, मोहम्मद अर्शद खान.

पंजाब किंग्ज : शिखर धवन (कर्णधार), मॅथ्यू शॉर्ट, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा, सिकंदर रझा, ऋषी धवन, लियाम लिव्हिंगस्टोन, अथर्व तायडे, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस, सॅम करन, कागिसो रबाडा, हरप्रीत ब्रार, राहुल चहर, हरप्रीत भाटिया, विद्वत कावेरप्पा, शिवम सिंग, हर्षल पटेल, ख्रिस वोक्स, आशुतोष शर्मा, विश्वनाथ प्रताप सिंह, शशांक सिंग, तनय त्यागराजन, प्रिन्स चौधरी, रिली रोसोव.

सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.