महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

आठ वर्षे कोमात असणाऱ्या लेफ्टनंट कर्नलचे निधन

06:38 AM Dec 26, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / जालंधर

Advertisement

येथील सेना रुग्णालयात गेली आठ वर्षे बेशुद्धावस्थेत असणारे लेफ्टनंट कर्नल करणबीर सिंग नट यांचे निधन झाले आहे. त्यांनी आपल्या सहसैनिकाचा जीव वाचविण्यासाठी त्याच्यावर झाडण्यात आलेली गोळी स्वत:वर घेतली होती. ती वर्मी लागल्याने ते बेशुद्धावस्थेत गेले होते. त्यांच्यावर गेली आठ वर्षे उपचार होत होते.

Advertisement

जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा येथे 2015 मध्ये दहशतवाद विरोधी अभियान सेनेने हाती घेतले होते. त्यावेळी एका संघर्षात दहशतवाद्यांशी दोन हात करताना दहशतवाद्यांनी त्यांच्या सहकाऱ्यावर गोळी झाडली होती. तथापि, चपळता दाखवून सिंग यांनी मधे पडून आपल्या सहकाऱ्याला वाचविले. या प्रयत्नात ते स्वत: गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या या पराक्रमासाठी त्यांना सेना पदकाने गौरविण्यात आले होते. त्यांनी 1998 मध्ये सेनेत सेवा करण्यास प्रारंभ केला. 14 वर्षांच्या सेवेनंतर त्यांना 2012 मध्ये सेवामुक्त करण्यात आले होते. त्यांनी एलएलबी आणि एमबीए हे अभ्यासक्रम नंतर पूर्ण केले. पण पुन्हा सशस्त्र दलांमध्ये सेवेसाठी त्यांचे आगमन झाले. 160 टीए तुकडीत ते सेवारत होते, तेव्हा ही घटना घडली.

पतीचा वाटतो अभिमान

त्यांच्या पश्चात त्यांचे पिता कर्नल जगतारसिंग नट, पत्नी नवप्रीत कौर आणि त्यांच्या कन्या गुनीत आणि अश्मीत (वय अनुक्रमे 19 आणि 10 वर्षे) असा परिवार आहे. आपल्या पतीच्या पराक्रमाचा आपल्याला अभिमान असून त्यांनी एक सेनाधिकारी म्हणून त्यांचे कर्तव्य पार पडले, अशी प्रतिक्रिया त्यांच्या पत्नी नवप्रीत कौर यांनी सोमवारी जालंदर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article