For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

12:50 PM Nov 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
Advertisement

पुढील आठवड्यात राज्यात तुरळक पावसाचा अंदाज, वादळाची शक्यता

Advertisement

पुणे : बंगालच्या उपसागरात शनिवारपर्यंत कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मिती होणार असून, याच्या प्रभावामुळे राज्यात पुढील आठवड्यात तुरळक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, पुढील काही दिवस तो कायम राहण्याचा अंदाज आहे. दक्षिण अंदमानच्या समुद्रात सध्या हवेची द्रोणीय स्थिती असून, 23  नोव्हेंबरपर्यंत त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात ऊपांतर होणार आहे. त्यानंतर पुढे या क्षेत्राची तीव्रता वाढणार आहे. हे क्षेत्र पश्चिम-उत्तर पश्चिमेकडे प्रवास करणार असून, यामुळे तामिळनाडू, केरळ, पाँडेचरी, आंध्र्र्र्र्र्र्र प्रदेशच्या भागात जोरदार पाऊस होणार आहे. याच्या प्रभावामुळे राज्यात बाष्पयुक्त हवा वाहणार असून, खासकऊन दक्षिण महाराष्ट्राच्या भागात ढगाळ वातावरण, तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यामुळे थंडीचा कडाका कमी होणार असून, किमान तापमान वाढणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

कोल्हापूर-दक्षिण कोकणात पाऊस 

Advertisement

गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दक्षिण महाराष्ट्रात पाऊस झाला होता. आताही तशीच स्थिती निर्माण झाली असून, 26 नोव्हेंबरनंतर कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्गच्या भागात पावसाचा अंदाज आहे.

 हुडहुडी कायम 

राज्यात थंडीने हुडहुडी भरविली असून, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात याचा कडाका जास्त आहे. पुढील पाच दिवस थंडी कायम असेल, त्यानंतर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असल्याने कडाका कमी होईल.

Advertisement
Tags :

.