भात आवडतो पण वजन वाढण्याची भीती आहे? मग ट्राय करा ब्राऊन राईसची ही रेसिपी
वजन कमी करण्यासाठी लोक जिमपासून योगा पर्यंत घाम गाळतात. पण बरेच लोक वजन कमी करण्यासाठी भात खाणे टाळतात, असे मानले जाते की भात खाल्ल्याने ते लठ्ठ होतात, परंतु पांढरा भात सोडून डायट करणाऱ्यांना ब्राऊन हा राइस उत्तम पर्याय आहे. ब्राऊन राईस मध्ये अनेक पोषक गुणधर्म आहेत. आज आपण ब्राऊन राइसची खिचडी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत. जी रेसिपी वजन कमी करण्यास मदत करते. शिवाय ब्राऊन राइस खाण्यास स्वादिष्ट आहे. त्यामुळे ज्यांना भात आवडतो पण वजन वाढण्याची भीती वाटते ते ब्राऊन राईस खाऊ शकतात.
साहित्य
१/२ कप ब्राऊन राइस
१ वाटी मूग डाळ
२ चमचे तूप
१ चमचा आले-मिरची पेस्ट
1 चमचा जिरे
१/२ चमचा हिंग
१/२ चमचा हळद पावडर
२ लवंगा
दालचिनीचा तुकडा
३ काळी मिरी
चिरलेली कोथिंबीर
कृती
हेल्दी खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम ब्राऊन राइस आणि मूग डाळ एकत्र करा आणि ३० मिनिटे पाण्यात भिजवा. यानंतर प्रेशर कुकरमध्ये तेल किंवा तूप गरम करून त्यात जिरे घाला. नंतर कढीपत्ता सोबत किसलेले आले-मिरची पेस्ट घाला. काही सेकंद परतून घ्या आणि त्यामध्ये कांदा घाला. आणि एक मिनिट परतून घ्या यानंतर काली मिरी ,लवंग आणि दालचिनी त्यामध्ये घाला. मसाले परतून घेतल्यानंतर भाज्या घाला. नंतरत्यामध्ये ब्राऊन राईस-मुग मिश्रण घाला. खिचडी थोडी पातळ होण्यासाठी त्यामध्ये दोन ते अडीच वाटी पाणी घाला . यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवा.तयार झालेल्या खिचडीवर थोडी कोथिंबीर घालून सजवा आणि गरमागरम सर्व्ह करा.