For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मातृभाषा प्रेम हाच यशाचा पाया

06:41 AM Feb 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
मातृभाषा प्रेम हाच यशाचा पाया
Advertisement

आज मराठी भाषा गौरव दिन साजरा होत आहे. यानिमित्त हा विशेष लेख...

Advertisement

स्वातंत्र्यानंतर, प्रादेशिक भाषा (Regional Language) तत्वावर,  भारताची 15 प्रांतात (States) विभागणी केली गेली. मराठी मातृभाषा असलेल्यांचा महाराष्ट्र प्रांत झाला. काही वर्षातच, महाराष्ट्र हा भारतातला एक अत्यंत प्रगतीशील पुढारलेला प्रांत आहे, अशी भारतातच नव्हे तर जगभर महाराष्ट्राची ख्याती पसरली. असं असूनही, महाराष्ट्रातल्या मराठी मातृभाषा असलेल्या प्रजेला, महाराष्ट्रातच दुय्यम दर्जा प्राप्त झाला आहे, त्याला कारणीभूत आहेत मराठीच. कारण आर्थिक बाबतीत मराठी माणसाला अपयश आलं. अपयश का आलं? तर मराठी माणूस आपल्या मराठी मातृभाषेला विसरला, मातृभाषा प्रेम हाच यशाचा पाया आहे हे मराठी माणसाला उमगलेलंच नाही.

म्हणूनच, मराठी मातृभाषा दिवस, भाषणे करुन साजरा करण्यापेक्षा, मराठी माणसाने मराठी मातृभाषेचं महत्त्व काय आहे हे समजून घ्यायला पाहिजे. मराठी मातृभाषा प्रेम, हाच यशाचा पाया आहे हे समजून घ्यायला पाहिजे, मगच मराठी प्रजेची आर्थिक प्रगती होईल व महाराष्ट्र मराठी लोकांचा प्रांत होऊ शकेल. म्हणून मातृभाषा महत्त्वाची. मातृभाषा हा मानसिक मनाचा एक खजिना आहे. या खजिन्यामध्ये भूतकाळात जिंकलेल्या ट्रॉफीज आहेत व भविष्यकाळात गाजवायचे पराक्रम आहेत.

Advertisement

या मानसिक मनाच्या खजिन्याची सुरवात होते, आईच्या गर्भाशयातल्या गर्भापासून (embryo). पाच आठवड्यात, त्या गर्भात हृदयाचे ठोके पडू लागतात, आणखीन 22 आठवड्यानंतर त्या लहान बाळाचा मेंदू जागृत होतो, आणि त्या लहान बाळाच्या मनोविकासाला (Personality Development) सुरवात होते.

मनोविकासाला सुरवात होते मातृभाषेपासून. बाळाची आई काय बोलते हे बाळाच्या कानावर जातं. हळूहळू बाळाला आईच्या मातृभाषेची सवय होते. बाळाला भाषा कळत नसली आणि जरी त्याला आईच्या भाषेतला काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर; या भावना कळत नसल्या, तरी उमजू लागतात. आईला आनंद झाला तर बाळाच्या इवल्याश्या ओठावर हसू उलगडणारच. आईचं मन खिन्न झालं तर बाळाला वेदना होणारंच. आई बाळावर जितकं प्रेम करते त्याच्यापेक्षा हजारपटींनी हे चिमूकलं बाळ आईवर प्रेम करतं. मातृभाषा म्हणजे काय हे त्या बाळाला कसं माहिती असणार? पण आपली आई जी काय बडबड करते, त्याचे बाळाच्या मनावर ठसे पडू लागतात. कळत न कळत त्या मातृभाषेवर बाळाचं प्रेम जडतं. ती मातृभाषा ऐकली की तो इवलासा जीव, “आनंदी आनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” गुणगुणत गर्भाशयात बागडत असलेलं आईला जाणवतं. म्हणते “बाळ लाथा मारतय”. त्या लाथा नसतात, तो सालसा डान्स असतो. हे खरं मातृभाषेवरच्ंा प्रेम. आपली मातृभाषा कुठली, हे महाराष्ट्राच्या राजकर्त्यांना जरी उमगलं नसलं, तरी 22 आठवड्याच्या या इवुकल्या जीवाला (बाळाला), 22 आठवडे आईच्या गर्भात राहून कळलेलं असतं.

लहान मुलांमुलींची, वैयक्तिक व सांस्कृतिक ओळख (personal and cultural identity) विकसित होते. वडापाव खाऊन नव्हे, तर मातृभाषेने. सांस्कृतिक या शब्दातला मूळशब्द, संस्कृती (कल्चर). संस्कृती म्हणजे काय? असं विचारलं, तर सरळ साधं स्पष्टीकरण कुणाकडे नसतं. साहजिकच आहे. दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र महाराष्ट्राचा. संस्कृती म्हणजे काय हे शाळेत शिकवलं जात नाही, मग छोट्यांना काय की मोठ्यांना काय कसं उमगणार?

संस्कृती म्हणजे जीवनशैली (Lifestyle). आपल्या धर्मात जीवनशैली कशी असावी हे सांगितलं आहे. विष्णु पुराणात ही जीवनशैली ((Lifestyle). दिलेली आहे, ती खालील प्रमाणे.

ऐश्वर्यस्य समग्रस्य धर्मस्य यशस: श्रीय: ।।

ज्ञानवैराग्ययोश्वैव षणांभग एतिरणा ।। विष्णु पुराण 6.5.74

मराठी भाषांतर: धर्म, ज्ञान, निस्वार्थीपणा, यश, संपत्ती व ऐश्वर्य हे सहा सद्गुण (Virtues) आहेत ते सहा सद्गुण आत्मसात करण्यासाठी जगायचं, हीच जीवनशैली. श्रीमद भागवतम्मध्ये सुद्धा जीवनशैली कशी असावी ही दिलेलं आहे. ते खालील प्रमाणे.

एतावदजन्मसाफल्यमदेहिनामीहदेहिषु ।

प्राणैरथैधिर्या वाचा श्रेय अचारणम् सदा ।। श्रीमद भागवतम् 10.22.35

मराठी भाषांतर: दुसऱ्यांच्या हितासाठी, तन, मन, धन अर्पण करणं हीच खरी देवभक्ती आहे असं मी मानतो व त्यातच माझ्या जन्माचं सार्थक आहे अशी माझी श्रद्धा आहे. इतरांना यशस्वी होण्यास मदत करणं हीच खरी देवभक्ती आहे व त्यातच माझ्या जन्माचं सार्थक आहे, अशी माझी श्रध्दा आहे.

मुद्दा असा आहे की, आपल्याही धर्मात, संस्कृती या शब्दाच्या व्याखेत नैतिक मूल्यांना महत्त्व दिलेले आहे. दाणादाण वेडवाकडं नाचून, बोंबाबोंब करुन, गणपतीला बुडवणं ही हिंदू संस्कृती नाही.

मातृभाषा हा संस्कृतीचा पाया (foundation) आहे.  शिक्षण मातृभाषेचा पाया आहे व नैतिकमूल्य शिक्षणाचा पाया आहे. नैतिक मूल्य हा शिक्षणाचा एक महत्त्वाचा भाग नसेल तर त्याचे काय भयानक परिणाम होतात, हे Theodore Roosevelt ³ ाा अमेरिकन प्रेसिडेंटने ओळखलं होतं व अमेरिकन शिक्षण पद्धतीत ते अंमलात आणलं. Theodore Roosevelt cnCeeues,``To educate a man in mind and not in morals is to educate a menace to society.``

मराठी भाषांतर: नैतिकमूल्य न शिकवता, इतर सर्व काही शिकवणारी शिक्षणपद्धत, देशाला हानिकारक नराधम निर्माण करते.

सारांश असा की, सगळ्याची सुरवात होते मातृभाषेवरच्या प्रेमाने. पण हेच मराठी बाळ जसजसं वाढू लागतं, तसतसं त्याचं मराठी मातृभाषाप्रेम हळूहळू कमी व्हायला लागतं. कारण त्याच्या कानावर इतर भाषांचा भडिमार होऊ लागतो, विशेषत: हिंदीचा. छोट्या मनावर याचा भयानक परिणाम होतो. ही परकी भाषा सगळे बोलतात पण आपल्याला ही भाषा येत नाही, त्यामुळे त्याच्या मनात न्यूनगंडाचं बीज रोवलं जातं. मराठी बोलणं कमीदर्जाचं, हिंदी बोललं तर आपले सवंगडी आपल्याला जास्त भाव देतात, आपल्याला सामावून घेतात ही भावना त्याच्या मनात रुजते. मराठी मुलांमुलींच्या मानसिक न्यूनगंडामुळे त्यांच्या भावनिक विकासाचा (Emotional Development) चा पाया (foundation) खिळखिळा होतो, भावनिक विकास बरोबर झाला नाही की त्याचा परिणाम विचारसरणीवर होतो, विचारसरणी विस्कटली की मनोविकास (Personality Development)ढासळतो. पदरी अपयश येतं, कसंतरी खाली मान घालून परप्रांतीय काय देतील तो जॉब घेऊन उदरभरण करत जीवन जगायचं, हेच मराठी माणसाच्या महाराष्ट्रात राहूनही नशिबी.

पण तमिळ मुलंमुली या चक्रव्यूहातून जात नाहीत, कारण स्वाभिमानी तामिळनाडू शिक्षण मंत्रालयाने, भारताची तीन भाषा पॉलिसी (Local भाषा, हिन्दी व इंग्लिश) धुडकावून लावलेली आहे. तमिळनाडूत तमिळला महत्त्व, इंग्लिश शिकवलं जातं. कारण ती जगाची भाषा आहे. मराठी मातृभाषा प्रेम, हाच यशाचा पाया आहे हे समजून घ्यायला पाहिजे. मगच मराठी प्रजेची आर्थिक प्रगती होईल व महाराष्ट्र मराठी लोकांचा प्रांत होऊ शकेल. म्हणून मातृभाषा महत्त्वाची.

मातृभाषा प्रेम हाच यशाचा पाया

आईच्या गर्भाशयात ऐकलेली मराठी मातृभाषा, बाळाच्या विचारसरणीचा व भावनिक विकासाचा (Thought Process and Emotional Development ) चा पाया (foundation) आहे, हे जेंव्हा मराठी माणसाला उमगेल, तेंव्हा महाराष्ट्राचे भूमिपुत्र, शिवाजी महाराजांसारखे मान वर करुन, महाराष्ट्रात मराठी माणूस गुलाम नाही तर महाराष्ट्राचा मालक आहे, या भावनेने जगू लागतील.

- अनिल देसाई Orlando, Florida, U.S.A.

Advertisement
Tags :

.