नरकासुर वधाच्या रात्री 12 नंतर लाऊडस्पीकर, दारु, आतषबाजी बंद
पणजी : नरक चतुर्दशीच्या रात्री सरकारच्या नियमांनुसार रात्री बारानंतर सर्व कार्यक्रम बंद करणे बंधनकारक राहील. सर्व पथकांनी नियमांचे कडक पालन करावे. तसेच कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची दक्षता घ्यावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पणजी उपविभागीय अधिकारी सुदेश नाईक यांनी पणजी, आगशी आणि ओल्ड गोवा भागात नरकासुर करणाऱ्या आणि नरकासुर स्पर्धा आयोजित करणाऱ्या मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली आणि त्यांना नियम आणि कायद्याबाबत सविस्तर माहिती दिली. उत्सवाच्या काळात पोलिसांना कारवाई करण्यास भाग पाडू नका, अशी समजही दिली आहे.
पथकांना बैठकांतून दिली समज
राज्यातील विविध भागात नरकासुराच्या रात्री मोठमोठ्या मिरवणुका काढल्या जातात. मोठा धागडधिंगाणा घातला जातो. दरवर्षी बजाऊनही काही पथके ऐकत नसल्याचे दिसून आले आहे. नंतर कारवाई करावी लागते आणि त्याचा विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे राज्यातील विविध भागातील उपविभागीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत नरकासुर करणाऱ्या पथकांची बैठक घेऊन नियमांची माहिती दिली आहे.
पोलिसांनी पथकांना केले आवाहन...
- नरकासुरवधव दिवाळीचा आनंद लुटावा. मात्र इतरांना त्रास करु नका.
- अतीमद्यपानकरून अनुचित प्रकार करण्याचाही प्रयत्न कोणी करू नये.
- रस्त्यातधांगडधिंगाणाकरत रस्ते अडविण्याचे प्रयत्न करु नयेत.
- वेळेचबंधनकाटेकोरपणे पाळवे, अन्यथा कारवाई होईल.
- कोण्त्याहीनियमांचेउल्लंघन करू नये, अन्यथा कारवाई होईल.
- नरकासुरस्पर्धांच्यावेळीलाऊडस्पीकर लावू नयेत.
- रात्री12 नंतरसर्व लाऊडस्पीकर बंद करावेत.
- ज्येष्ठतसेचवयोवृध्द लोकांना त्रास होऊ देऊ नये.
- दारूकामाचीआतशबाजीकरताना दक्षता पाळावी.