बॉसचे घर खरेदी करत केले जमीनदोस्त
प्रमोशन नाकारल्यावर ज्युनियरने उगविला अनोखा सूड
एका कर्मचाऱ्याला प्रमोशन मिळाले नाही आणि याचा सूड त्याने बॉसकडून अशाप्रकारे उगविला की पूर्ण जग अचंबित झाले. अमेरिकन अब्जाधीश डेव्हिड टेपर यांनी हे केले आहे. 1989 मध्ये गोल्डमॅन सॅक्सचे बॉक्स जॉन कोरजाइन यांनी टेपर यांना पार्टनरशिप देण्यास नकार दिला होता. तेव्हा हा निर्णय इतिहास ठरेल, याची कल्पनाही नव्हती. वॉल स्ट्रीटचे प्रसिद्ध गुंतवणुकदार आणि कॅरोलाइना पँथर्सचे मालक डेव्हिड टेपर हे सध्या चर्चेत आहेत. 67 वर्षीय अब्जाधीश स्वत:च्या कुशाग्र बुद्धीसाठी ओळखला जातो, तसेच तो स्वत:चा अपमान कुठल्याही स्थितीत विसरत नाही.
प्रमोशन न मिळाल्याचा राग
1989मध्ये मार्केट क्रॅशनंतर गोल्डमॅन सॅक्सला सावरण्यात टेपर यांचे मोठे योगदान होते. तरीही तत्कालीन सीईओ जॉन कोरजाइन यांनी त्यांना पार्टनरशिपच्या प्रमोशनपासून वंचित केले. या अपमानाने दुखावलेल्या टेपर यांनी गोल्डमॅन सॅक्स सोडत स्वत:ची हेज फंड कंपनी अप्पालुसा मॅनेजमेंट स्थापन केली. पुढील काळात हीच कंपनी वॉल स्ट्रीटवरील सर्वात यशस्वी हेज फंड कंपनीपैकी एक ठरली.
43 दशलक्ष डॉलर्समध्ये घराची खरेदी
कहाणी येथेच संपली नाही. 2010 मध्ये टेपर यांनी कोरजाइन यांच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीकडून त्यांचे हॅम्पटन येथील बीच हाउस 358 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. हा व्यवहार त्या काळात हॅम्पटन क्षेत्रातील सर्वात महाग मालमत्ता व्यवहार मानला गेला.
जुने घर पाडविले
केवळ घर खरेदी करणे पुरेसे नव्हते. टेपर यांनी 6165 चौरस फुटांच्या या महालाला पूर्णपणे पाडविले आणि यानंतर तेथे एका नवा महाल उभा केला. जो दुप्पट आकाराचा होता. जवळपास 4 वर्षे चाललेल्या या बांधकामानंतर तयार झालेला त्यांचा नवा महाल 11,268 चौरस फूटात फैलावलेला आहे. यात ओशन ह्यू, स्वीमिंग पूल आणि टेनिस कोर्टही सामील आहे. 2010 मध्ये टेपर यांना या ‘रिवेंज’बद्दल प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी हसत तुम्ही असे म्हणू शकता असे उत्तर दिले होते.