पैजेच्या नादात गमावला जीव
20 मिनिटात मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन
थायलंडचे प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंसर थानाकरन कांथी यांना ऑनलाइन ‘बँक लिसेस्टर’ नावाने ओळखले जात होते. त्यांनी नेहमीच चॅलेंज स्वीकारुन पैसे कमाविले, परंतु एक चॅलेंज त्यांच्यासाठी आयुष्यातील अखेरचे ठरले. 21 वर्षीय कांथी यांना 75.228 रुपये जिंकण्यासाठी 20 मिनिटात विस्कीच्या दोन बॉटल्स संपविण्याचे आव्हान देण्यात आले होते.
कांथी अशाप्रकारच्या जोखिमयुक्त कामांसाठी ओळखले जायचे. त्यांनी यापूर्वी हँड सॅनिटायजर आणि वसाबी खाण्यासारखे धोकादायक चॅलेंज पूर्ण केले होते. परंतु यावेळचे आव्हान त्यांच्या जीवावर बेतले आहे. चंथाबुरीच्या था माई जिल्ह्यात जन्मदिनाची पार्टी सुरू असताना कांथी यांना 350 एमएलच्या रिजेन्सी विस्कीची एक बॉटल पिण्यासाठी 10 हजार थाई बहतची ऑफर देण्यात आली, गर्दीने उत्साह वाढविला आणि कांथी यांनी चॅलेंज स्वीकारले. परंतु मद्यधुंद स्थितीत कांथी यांनी 20 मिनिटात दोन बॉटल्स संपविल्या.
चॅलेंजनंर कांथी अचानक अडखळले आणि तेथेच कोसळले. तेथे उपस्थित लोकांनी याचे चित्रिकरण केले. कुणीच मदतीसाठी पुढे आला नाही. कांथी यांना नंतर रुग्णालयात हलविण्यात आले असता डॉक्टरांनी त्याच्या मृत्युची पुष्टी दिली. मृत्यूचे कारण अल्कोहल पॉइजनिंग असल्याचे सांगण्यात आले. कांथी यांना धोकादायक चॅलेंज देणाऱ्या इसमाला पोलिसांनी अटक केली आहे. छापेमारीत त्याच्या घरातून पिस्तूल हस्तगत झाले. चौकशीत त्याने स्वत:चा गुन्हा कबूल केला. आता त्याला याप्रकरणी 10 वर्षांची शिक्षा आणि 50,125 रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.