दोन दिवसात १० टन ऊस पूर्णपणे उध्वस्त
खानापूर - खानापूर पासून ३ किलोमीटर असलेल्या असोगा येथील शेतकऱ्यांचे जंगली जनावरांकडून प्रचंड नुकसान होत आहे. हातात तोंडाशी आलेले भात पीक ऊस पिक जंगली जनावरे येऊन फस्त करत आहेत. असोगा येथील शेतकरी संभाजी पाटील यांच्या ऊस गव्यानी दोन दिवसात १० टन ऊस पूर्णपणे उध्वस्त केला आहे. त्यामुळे संभाजी पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. तसेच आत्माराम पाटील, मोतीराम बसेटकर यांचे कापणीला आलेले भातपीक गव्यानी पूर्णपणे खाऊन संपवले आहे. तसेच रानडुक्कर ,गवे, चितळ यासह इतर जंगली प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांचे जीवन कस्टमय बनले आहे .शेती करावी का नको हाच प्रश्न शेतकऱ्यांसमोर उद्भवला आहे. शेतकरी काबाडकष्ट करून पीक तयार झाल्यानंतर वन्यप्राण्यांच्या त्रासामुळे हातात तोंडाशी आलेली पीक हे प्राणी खाऊन शेतीचे नुकसान करत आहेत. तसेच शासनाकडून नुकसान भरपाई देण्यात येत नाही .मात्र अर्ज करण्यास सांगण्यात येते,मात्र अर्ज करण्याचा खर्च आणि झाले नुकसान हे पाहता शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई देखील नको वाटते.