कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एप्रिलमध्ये 4.08 कोटींचा तोटा

12:03 PM May 26, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागाला एप्रिल 2025 मध्ये तब्बल चार कोटी आठ लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. या गंभीर स्थितीची दखल एसटीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांनी घेतली असून, विभागीय पातळीवर विचारमंथन सुरू झाले आहे.

Advertisement

राज्यातील एकूण एसटी महामंडळाला एप्रिलमध्ये 13.56 कोटी रुपयांचा नफा झाला असतानाही कोल्हापूर विभागाचा त्यात फारसा वाटा नव्हता. नफ्याच्या तुलनेत कोल्हापूर विभागात सरासरी उत्पन्न केवळ 70 ते 80 लाखांपर्यंतच मर्यादित राहिले आहे, जे दररोजच्या दीड कोटी उत्पन्नाच्या अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे.

या घसरणीमुळे कोल्हापूर विभागाची राज्यातील क्रमवारीत 17वी स्थानावर घसरण झाली आहे. यामुळे महसुली दृष्टीने विभाग मागे पडत चालला आहे.

या संदर्भात विभाग नियंत्रक शिवराज जाधव यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र तो होऊ शकला नाही.

कोल्हापूर विभागात काही अधिकारी उत्पन्न वाढीऐवजी कर्मच्रायांच्या बदल्यातच अधिक रस घेत असल्याची चर्चा आहे. एका एसटी संघटनेचा प्रमुख लिपिकांच्या विनंती बदल्यांमध्ये विशेष रस दाखवत असल्याचे बोलले जात आहे. तसेच, यांत्रिक विभागातील चालकवाहकांच्या प्रतिनियुक्तीवर लक्ष केंद्रीत असल्याने उत्पन्न वाढीसाठी आवश्यक असलेले नियोजन दुर्लक्षित होत असल्याचे काही कर्मच्रायांचे म्हणणे आहे.

या घसरणीमुळे कोल्हापूर विभागातील प्रवासी आणि विभागाची प्रतिमा यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. महसूल वाढीसाठी प्रवासी केंद्रित धोरण, नियमित सेवा, कर्मचारी कार्यक्षमता आणि कारभारात पारदर्शकता आवश्यक आहे. वरिष्ठ अधिक्रायांनी यावर तातडीने कारवाई करून, कोल्हापूर विभागाची घसरलेली स्थिती सुधारण्यावर भर देणे गरजेचे आहे. नाहीतर योग्य प्रशाकीय कारवाई करण्यात येईल.

                                                                               डॉ. माधव कुसेकर, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एसटी

690 एस.टी

1311 वाहक

1243 चालक

तोटयाची कारणे

एसटींची संख्या कमी

मनुष्यबळाची कमतरता

योग्य नियोजनाचा अभाव

वर्दळीच्या ठिकाणी एसटी नाहीत

आगरनिहाय एसटी संख्या

आगार              संख्या

कोल्हापुर           122

संभाजीनगर          79

इचलकरंजी          79

गडहिंग्लज          74

गारगोटी             62

मलकापूर            39

चंदगड                 46

कुऊंदवाड                46

कागल                 59

राधानगरी              36

गगनबावडा             14

आजरा                          34

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article