For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मनातलं हरवतांना...

06:37 AM Jul 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
मनातलं हरवतांना
Advertisement

तेव्हा मी बारा वर्षाचा होतो ......................

Advertisement

शाळेभोवतीचा निसर्ग, त्यातले बदल, भिरभिरत्या डोळ्यांनी बघत असायचो... जणू माझ्यात होणारे बदलच मला तिथे दिसायचे. आनंदाने बागडणारी फुलपाखरं

चिवचिवाट करणारी चिमणी, नाकतोड्याची गंमत, पानांची सळसळ, वाऱ्याचा थंडगार स्पर्श, मुठीत धरून ठेवलेली सकाळची कोवळी किरणं, असं खूप काही  घेऊनच मी घरी यायचो. पण आई-बाबा तुम्ही वळूनसुद्धा बघायचे नाहीत, प्रत्येक जण आपापल्या कामात. जो तो आपापल्या फोनवर किंवा लॅपटॉपवरचे काम करणारा ....माझं बोलणं, संवाद सगळं मनातल्या मनात राहून

Advertisement

जायचं.........................अशी एक कविता मध्यंतरी वाचनात आली. आत्ताच्या वातावरणाला ती अगदी तंतोतंत लागू पडते, असं वाटलं. अशावेळी मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. रम्य ते बालपण असं खऱ्या अर्थाने आम्ही म्हणू शकतो..... तेव्हाची एक कविता...

ऊठ मुला ऊठ मुला

बघ हा अरूणोदय झाला... कारण सकाळचा अरुणोदय दाखवून उठवणारी आई  उरलीच नाही. आजूबाजूला असणारे हे सगळे निसर्गरम्य चिवचिवाट आवळी भोजनं, चैत्राचे हळदीकुंकू, मंगळागौरी, वटपौर्णिमा अशा कितीतरी गोष्टी आम्ही आनंदाने भरभरून जगलोय. जी गोष्ट आत्ताच्या पिढीच्या वाट्याला येतच नाही. त्याची मात्र खंत वाटते. अशावेळी साने गुरुजींच्या गोष्टीतली आई आमच्या डोळ्यासमोर येते. जसं नेहमीच म्हटलं जातं की शाम घडला पाहिजे, तसं आता मला वाटायला लागलं की आता श्यामची आई घडायची गरज जास्त आहे. कारण मुलांच्या भावविश्वाशी जोडलं जाऊन कसं वागावं याचा एक सुंदर वस्तूपाठ या कथांमधून आम्हाला मिळायचा. मुलांचं भावविश्व त्याला आवडणाऱ्या नावडणाऱ्या गोष्टी रोजच्या जगण्यातून नकळत जपणारी श्यामची आई चांगल्या वाईट गोष्टी जाणीवपूर्वक आम्हाला दाखवून द्यायची. घरात कोणती गोष्ट किंवा खाऊ आणला तर तो दुसऱ्याला दिल्याशिवाय खायचा नाही, याचा अप्रत्यक्ष संस्कारच ती आमच्यावरती करायची. अगदी साधा फणस कापला तरी आधी दुसऱ्याला देऊन ये कारण ‘देतो तो देव आणि राखतो तो राक्षस’ असा संस्कार त्यावेळेला नकळत मिळून जायचा. निसर्गाच्या सानिध्यात नेणारी आई अंगणात बसून मुलांना निसर्ग वाचन शिकवायची. घर कामात 24 तास असली तरी निसर्गातले अवतीभोवतीचे बदल, स्वभाव आणि माणसाच्या वागण्याच्या पद्धती ती सहज दाखवून जायची. याच्या मागचं कारण म्हणजे तिच्या जगण्यातला नेमस्तपणा, नवनवीन अनुभवायची उत्सुकता आणि रोजच्या दिवसाची आनंदाने स्वागत करायची तिची पद्धत. आता कुठेतरी लुप्त होत चालली आहे. पाहुण्यांचे येणं-जाणं संपत आलंय. आम्ही मात्र दमलेल्या बाबाची कहाणी ऐकताना बाबा कसा घरासाठी काम करतो हे आवर्जून सांगत राहतो पण या दमलेल्या बाबाला सांगावसं वाटतं की आम्हाला खूप पैसा नकोय पण तुझा सहवास हवाय. तुझ्याबरोबर दंगामस्ती करायला हवी आहे. आई मात्र मदर्स रेसिपी ममाज् किचन असल्या गोष्टी ऐकून पदार्थ बनवते. त्यापेक्षा पारंपारिक, सगळ्यांनी बसून आईने केलेलं साधं जेवण एकत्र जेवायला आवडेल असं सांगावंसं वाटतं. पण हे सगळं वाटणं किंवा मनातल्या भावना हळूहळू कुठेतरी तुटत चालल्या आहेत असंच वाटायला लागतं.

पूर्वार्ध

Advertisement
Tags :

.