महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वजन कमी करा, नोट कमवा

06:24 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कंपनीकडून जबरदस्त ऑफर, 1 कोटीचा निधी

Advertisement

वजन कमी करण्याची प्रत्येकाची इच्छा असते, परंतु याच्यासाठी कराव्या लागणाऱ्या तडजोडी कळल्यावर लोक मागे हटतात. परंतु जर तुम्हाला वजन कमी करण्यासाठी पैसे मिळू लागल्यास तुम्ही कुठल्याहीप्रकारे वजन कमी करण्यासाठी झोकून द्याल. काहीसा असाच प्रकार शेजारी देश असलेल्या चीनच्या एका कंपनीत होत आहे. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना एक ऑफर दिली जात असून ती कळल्यावर तुम्हीही कंपनीचे कौतुक कराल.

Advertisement

चीनच्या गुआंगडॉन्ग प्रांतातील एका कंपनीकडून कर्मचाऱ्यांना स्वत:चे वजन कमी करा आणि बदल्यात पैसे मिळवा अशी ऑफर देण्यात आली आहे. मागील वर्षी सादर झालेल्या या ऑफर अंतर्गत अनेक जणांनी स्वत:चे वजन कमी करत कमाई केली आहे.

ही कंपनी शेनजेंग येथे आहे. कंपनीकडून मागील वर्षाच्या प्रारंभी स्लिमिंग प्रोग्राम सुरू करण्यात आला होता. आतापर्यंत यात 150 जणांनी भाग घेतला असून त्यांनी मिळून एकूण 800 किलोग्रॅम वजन घटविले आहे. याकरता सर्व कर्मचाऱ्यांना मिळून कंपनीकडून एकूण 1 कोटी 12 लाख 94 हजार 432 रुपये इनाम म्हणून देण्यात आले आहेत. ही योजना वेट लॉस बूट कॅम्पप्रमाणे काम करते. प्रत्येक कॅम्प 3 महिन्यांसाठी असतो, ज्यात एकूण 30 कर्मचारी असतात. आतापर्यंत असे 5 कॅम्प तयार झाले आहेत.

कर्मचाऱ्यांकडून मोठा प्रतिसाद

या प्रोग्रामसाठी कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येत अर्ज केले आहेत. स्थुलत्वाने ग्रस्त असलेल्या लोकांची यात निवड केली जात आहे. प्रत्येक कॅम्पमध्ये सदस्यांना 3 गटांमध्ये विभागले जाते, ज्यात 10 चे दोन गट आणि एका गटात 5 सदस्य ठेवले जातात. प्रत्येक अर्धा किलो वजन कमी केल्यावर सदस्याला 4593 रुपये मिळतात. परंतु जर त्यांच्या गटातील कुठल्याही सदस्याचे वजन वाढले तर कुठल्याही सदस्याला इनामाची रक्कम मिळत नाही. उलट त्यांना 5700 रुपयांचा दंड भरावा लागतो.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article