महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गेहलोतांचे निकटवर्तीय दाधीच भाजपमध्ये

05:26 AM Nov 11, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

जोधपूरचे माजी महापौर : काँग्रेसला झटका

Advertisement

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे निकटवर्तीय आणि जोधपूरचे माजी महापौर रामेश्वर दाधीच यांनी गुरुवारी  उमेदवारी अर्ज मागे घेतला. परंतु चार दशकांपेक्षा अधिक काळापासून काँग्रेसमध्ये कार्यरत दाधीच यांनी  भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे. राजस्थान भाजपचे प्रभारी प्रल्हाद जोशी, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

Advertisement

दाधीच यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्याने यापूर्वी राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. परंतु ते भाजपमध्ये सामील होतील अशी कल्पना कुणीच केली नव्हती. गेहलोत यांच्या सुचनेवरून त्यांनी स्वत:चा अर्ज मागे घेतला होता. परंतु दाधीच यांच्या भाजपप्रवेशामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. दाधीच हे जोधपूरचे महापौर आणि गेहलोत यांचे निकटवर्तीय राहिले आहेत. जोधपूरच्या सूरसागर मतदारसंघाची उमेदवारी त्यांनी मागितली होती. परंतु उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या विनंतीनुसार त्यांनी अर्ज मागे घेतला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची निर्णय घेण्याची क्षमता पाहून प्रभावित झालो आहे. मोदी पंतप्रधान नसते तर राम मंदिराची उभारणी झाली नसती असा दावा दाधीच यांनी केला आहे.

समीकरणे बदलणार

भाजपने निवडणुकीच्या काळात रामेश्वर दाधीच यांना स्वत:सोबत जोडले आहे. दाधीच हे भाजपमध्ये सामील झाल्याने सूरसागर मतदारसंघातील समीकरणे बदलणार आहेत. भाजप ब्राह्मण समुदायाच्या मतदारांना स्वत:च्या बाजूने वळविण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. दाधीच हे माजी महापौर राहिले असल्याने ब्राह्मण समुदायावर त्यांची चांगली पकड आहे. दाधीच यांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपला लाभ होणार असल्याचे मानले जात आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article