सुर्य किरणांनी तेजाळले प्रभु रामाचे रुप! आयोध्येतील राममंदिरातील ऐतिहासिक घटना
रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर, अयोध्येतील राम मंदिर एका उल्लेखनीय घटनेचे साक्षीदार झाला. आज राम लल्लाच्या मूर्तीच्या कपाळावर 'सूर्य तिलक' करण्यात आला. सूर्यप्रकाशाच्या दिव्य किरणांनी रामलल्लाला अभिषेक करण्यात आला. हा अभिषेक लाखो रामभक्तांनी पाहीला असून त्यांनी या अभुतपुर्व क्षणाची अनुभुती घेतली.
आयोध्येतील राम मंदिराचे जानेवारी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्धाटन झाले. राममंदीराचा लोकार्पण सोहळा देशातील करोडो भाविकांनी टिव्हीवर पाहीला. या अभुतपुर्व सोहळ्यानंतर आता रामनवमीच्या पार्श्वभुमीवर आयोध्येमध्ये प्रभुरामाच्या मस्तकावर सुर्यकिरणांचा अभिषेक करण्यात आला. राम मंदिर ट्रस्टने नियुक्त केलेल्या शास्त्रज्ञांनी सुर्यकिरणांच्या दिशांचा अभ्यास करून अत्यंत बारकाईने आरशांचा वापर करून एक यंत्र तयार केले होते. त्यामुळे सूर्यप्रकाशाचा एक किरण अचूकपणे मूर्तीच्या कपाळावर स्थिर झाला. अंधाऱ्या गाभाऱ्यात रामलल्लाच्या मुर्तीवर पडलेल्या सुर्यकिरणांनी मुर्ती तेजाळली. या विलोभनिय दृश्याचे व्हिडीयो
सोशलमिडीयावर व्हायरल झाले आहेत.
प्रभु रामाला सूर्य टिळकांनी अभिषेक होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आसाममधील नलबारी येथील निवडणूक रॅलीत ऐतिहासिक प्रसंगाचा उल्लेख केला. ‘जय सियावर राम’ च्या जयघोषात पंतप्रधान म्हणाले, “आज रामनवमीचा ऐतिहासिक सोहळा आहे. 500 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रभू राम त्यांच्या भव्य मंदिरात विराजमान झाले आहेत. आता काही मिनिटांनी प्रभू रामाला सूर्य टिळक लावून त्यांची जयंती पवित्र नगरी अयोध्येत राम मंदिरात साजरी केली जाणार आहे." असे आवाहन केले.