For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

22 मार्चला झळकणार ‘लुटेरे’ सीरिज

06:16 AM Mar 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
22 मार्चला झळकणार ‘लुटेरे’ सीरिज

रोमांचक ट्रेलर प्रदर्शित

Advertisement

ओटीटीच्या काळात थ्रिलर कहाण्यांना महत्त्व आले आहे. आता हंसल मेहता आणि त्यांचे पुत्र जय यांनी लुटेरे ही नवी वेबसीरिज सादर केली आहे. रजत कपूर आणि आमिर अली यांची मुख्य भूमिका असलेल्या लुटेरे या सीरिजचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.

दिग्दर्शक हंसल मेहता यांना स्कॅम 1992, अलीगढ आणि शाहिद यासारख्या उत्तम वेबसीरिज आणि चित्रपटांसाठी ओळखले जाते. स्वत:च्या पित्याप्रमाणेच जय मेहता देखील चित्रपटनिर्मितीच्या जगतात स्वत:चे कौशल्य दाखविण्यासाठी सज्ज आहे. जयच्या दिग्दर्शनात साकारलेली वेबसीरिज ‘लुटेरे’ची चाहते दीर्घकाळापासून प्रतीक्षा करत आहेत. ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement

या ट्रेलरमध्ये सागरी चाच्यांद्वारे भारतीय जहाजाची लूट होत असल्याचे त्यावर कब्जा होत असल्याचे दाखविण्यात आले आहे. परंतु सागरी चाच्यांच्या कब्जानंतर जहाजावर रोमांचक घटना घडत असल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येते, रजत कपूर, आमिर अली, विवेक गोम्बर, अमृता खानविलकर आणि चंदन रॉय सान्याल या कलाकारांच्या यात मुख्य भूमिका आहेत.

Advertisement

लुटेरे या सीरिजचा ट्रेलर पाहून चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. 22 मार्च रोजी लुटेरे ही सीरिज ऑनलाइन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.

Advertisement
Tags :
×

.