For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

झापडेमधील फणस बागेला लंडनच्या गुंतवणूकदाराची भेट

12:48 PM Sep 23, 2025 IST | Radhika Patil
झापडेमधील फणस बागेला लंडनच्या गुंतवणूकदाराची भेट
Advertisement

लांजा :

Advertisement

तालुक्यातील झापडे गावामध्ये असलेल्या हरिश्चंद्र देसाई यांच्या फणस बागेला नुकतीच युनायटेड किंग्डम, लंडन येथील नामांकित व्यावसायिक आणि गुंतवणुकदार ग्रॅहम नोबेल व त्यांचा मुलगा यांनी भेट दिली. कोकणातील शेतमाल व त्याचे बाय प्रोडक्ट्स जागतिक बाजारपेठेत पोहोचावेत यासाठी ते आग्रही असून स्थानिक शेतकरी उत्पादक कंपनीसोबत कार्य करण्याचा निर्णय त्यांनी या भेटीत जाहीर केला.

युवा शेतकरी मिथिलेश देसाई, गौरव सोमवंशी यांच्यासह त्यांचा मित्र जोएल मायकेल (दुबई) हे विशेष मेहनत घेत आहेत. त्यांच्यावतीने गेल्या पंधरा महिन्यांपासून युनायटेड किंग्डम, इराण व दुबई येथील व्यावसायिक भागीदारांशी सातत्यपूर्ण संपर्क साधत अनेक सॅम्पल्स पाठविण्यात आले होते. या प्रक्रियेतील यशस्वी टप्प्यानंतर नोबेल यांना प्रत्यक्ष भेट देण्याची उत्सुकता निर्माण झाली आणि त्यांनी कोकणातील शेतमालाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

Advertisement

ग्रहम नोबेल हे कृषी क्षेत्रातील व व्हें ल्यू-ऍडेड उत्पादनांमध्ये गुंतवणूक करणारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील गुंतवणूकदार आहेत, त्यामुळे त्यांनी देसाई आणि सहकाऱ्यांच्या प्रयत्नांबाबत मोठा रस दाखवला. झापडे येथील ही भेट केवळ एका फणस बागेपुरती मर्यादित न राहता भारतासह युनायटेड किंग्डम, दुबई आणि इराण या देशांदरम्यान कृषी व्यापार व नवनिर्मितीतील संबंध अधिक दृढ करणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान भविष्यात कोकणातील फणस काजू, आंबा व त्यांचे व्हॅल्यू ऍडेड प्रोडक्ट्स आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकावेत आणि शेतकऱ्यांना त्याचा थेट फायदा मिळावा यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

  • विविध विषयांवर चर्चा

भेटीदरम्यान फणस, काजू व आंबा या उत्पादनांच्या व्हॅल्यू चेन, त्यातील तंत्रज्ञानाचा वापर, टेसेबिलिटी आणि निर्यातीच्या संधी यावर सखोल चर्चा झाली. कोकणातील शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी तंत्रज्ञानाची जोड देणे आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा या सर्व उपक्रमामागचा प्रमुख उद्देश असल्याचे मिथिलेश देसाई यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.