महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोलयेच्या कथित फिल्म सीटीला लोलये ग्रामसभेचा विरोध

11:41 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

2016 चा ग्रामसभेच्या ठरावाची कार्यवाही करण्याची एकमुखी मागणी

Advertisement

काणकोण : लोलयेच्या भगवती पठारावर होऊ घातलेल्या कथित फिल्म सीटी प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला असून 2016 साली झालेल्या ग्रामसभेत या पंचायत क्षेत्रांत पर्यावरणाला बाधा आणणाऱ्या कसल्याच प्रकल्पाना थारा देऊ नये याच ठरावाची यापुढे देखील कार्यवाही करण्यात यावी असा ठराव या ग्रामसभेंत घेण्यात आला आहे. या ग्रामसभेला साधारणपणे 300 पेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. डॅनिस फर्नाडिस यानी मांडलेल्या या ठरावाला प्रशांत पागी यानी अनुमोद दिल्यानंतर ग्रामसभेला उपस्थित असलेल्या बहुसंख्य ग्रामस्थांनी आवाजी मतदानाने या ठरावाला अनुमोदन दिले. त्यामुळे इतके दिवस या फिल्म सीटी संबधी चालू असलेल्या चर्चेला विराम बसला आहे. विकासाच्या नावाखाली येथील जमीनी लाटण्याचा आणि पर्यावरणाचा ऱ्हास करण्याचा डाव या ग्रामसभेत नागरीकांनी उधळून लावला आहे.

Advertisement

आजच्या ग्रामसभेत हा विषय जरी विषय पत्रिकेवर नव्हता तरी देखील विकासाचा मुद्दा आणि सभापती रमेश तवडकर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई  यांच्या वक्तव्याचा आधार घेऊन पर्यावरण प्रेमी मनोज प्रभुगावकर, कॅजी डिसिल्वा, डॅनिस फर्नाडिस, प्रशांत पागी, शैलेश पागी आणि अन्य ग्रामस्थांनी फिल्म सीटीचा विषय चर्चेला घेण्यासंबधीचा हट्ट धरला. फिल्म सीटीला समर्थन देण्यासाठी काही मोजकेचा नागरीक या वेळी उपस्थित होते. मात्र 2016 साली घेतलेल्या ठरावाचीच कार्यवाही करण्याची मागणी फिल्म सीटीला विरोध करणाऱ्या    ग्रामस्थांनी केल्यामुळे समर्थकांची हवाच जाण्याची पाळी या ठिकाणी निर्माण झाली. या ठरावाच्या प्रती मुख्यमंत्री, सभापती, मनोरंजन सोसायटी, जिल्हाधिकारी याना पाठविण्यात येणार असल्याचे श्री. मनोज प्रभुगावकर यानी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

या पंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचा निशा च्यारी यानी या विषयावर बोलताना स्पष्ट केले की, अजूनही पंचायतीमध्ये फिल्म सीटी संबधी अर्ज आलेला नाही. शिवाय  या विषयावर चर्चा करण्यासाठी विशेष ग्रामसभा बोलवावी लागेल असे स्पष्ट केले. लोलये येथे एका खाजगी मालकीच्या 8900 चौ.मी. इतक्या जमीनीवर बेकायदा बांधकाम चालू आहे. मुळातच  ही जागा सेटलमेंट विभागात येत नसल्याची तक्रार करुन सदर बेकायदा बांधकाम मोडण्याचा ठराव श्री. प्रशांत पागी यानी मांडला आहे. त्याच प्रमाणे मागच्या 20 वर्षापासून चालू असलेला खोडये, व गाळये बंधाऱ्याचे काम त्वरित पूर्ण करण्यात यावे हा ठराव या ग्रामसभेत मांडण्यात आला आहे. या बैठकीला उपसरपंच चंद्रकांत सुदीर, सचिन नाईक, अजय लोलयेकर, माजी सरपंच भूषण प्रभुगावकर, अरूण भट, संजव तिळवे, डॅनिस फर्नाडिस, मनोज प्रभुगावकर, शैलेश पागी, अन्य नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article