महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोलये फिल्म सिटी : सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

06:22 AM Nov 12, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

लोलये कोमुनिदादकडून 250 एकर जागा देण्याचा प्रस्ताव

Advertisement

प्रतिनिधी/ पणजी

Advertisement

काणकोण तालुक्यातील लोलये येथे प्रस्तावित फिल्म सिटीसाठी साधनसुविधा विकासाच्यादृष्टीने गोवा मनोरंजन सोसायटीने व्यवहार सल्लागार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ईएसजीने हल्लीच 250 एकर जमिनीवर फिल्म सिटी विकसित करण्यासाठी जमीन मालकांना आमंत्रित केले होते. सदर जाहिरातीला प्रतिसाद म्हणून लोलये येथील कोमुनिदादने आपल्या मालकीची 250 एकर जमीन देण्याची तयारी दर्शविली होती. सदर प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर आता ईएसजी पुढील तयारीला लागली असून तेथे साधनसुविधा निर्माण करण्याच्या दृष्टीने सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया प्रारंभ केली आहे.

व्यवहार सल्लागार सेवा प्रदान करण्यासाठी सदर सल्लागाराने प्राधिकरण, व्यवहार सल्लागार सेवा आणि फिल्म सिटी विकास आदी कामांसाठी सक्षम खासगी विकासकाची निवड करण्यात मदत करणे अपेक्षित आहे.

व्यवहार सल्लागार सेवेचे हे काम दोन महिन्यांत पूर्ण करायचे आहे. तर सल्लागाराला दिलेले संपूर्ण काम 4 महिन्यांत (120 दिवसांत) पूर्ण करायचे आहे.

दरम्यान, फिल्म सिटीसाठी देऊ केलेल्या लोलयेतील सदर जागेवर यापूर्वी आयआयटी प्रकल्प उभारण्याचे प्रयत्न झाले होते. मात्र स्थानिकांनी त्याला प्रखर विरोध केला होता. त्यामुळे सरकारने त्या जागेचा विचार सोडून देत अन्य जागांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू केले होते, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

कोमुनिदादच्या प्रस्तावास स्थानिकांचा विरोध

त्या पार्श्वभूमीवर आता कोमुनिदादने स्वत: पुढाकार घेत ती भूमी फिल्मसिटीसाठी देण्याचा संकल्प केला आहे. ‘भगवती पठार’ नामक सदर महाप्रचंड जमीन ही जैवसंपदेने संपन्न असून असा कोणताही प्रकल्प तेथे उभारण्यात आल्यास तेथील जैवविविधता संपुष्टात येईल, अशी भीती तेथील स्थानिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे या प्रकल्पालाही जोरदार विरोध होऊ लागला असल्याचे वृत्त आहे. याकामी जैवविविधता मंडळाच्या सदस्यांनी सदर प्रकल्पास प्रखर विरोध केला असून मोप विमानतळासाठी जमिनी देणाऱ्यांची आज जी परिस्थिती झाली त्याचीच पुनरावृत्ती येथेही होईल, असा दावा केला आहे.

जैवविविधतेने संपन्न पठाराचे अस्तित्वचनष्ट होण्याची वर्तविली भीती

या प्रकल्पामुळे एक तर स्थानिकांना कोणताही लाभ होणार नाहीच, त्याशिवाय परिसरातील वनस्पती आणि प्राणिजात नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे. हा पठार म्हणजे राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचा अधिवास आहे. येथे शेकडो मोर मुक्त विहार करत असतात. त्याशिवाय वाघ, बिबट्या, हरण, रानडुक्कर, गवे, साळींदर, खवले मांजर, आदी प्राणीही मोठ्या संख्येने वावरत असतात. त्या सर्वांचा अधिवास नष्ट होणार आहे. भरीस या जागेचे पावित्र्य, तेथील जलस्रोत यांचेही अस्तित्व नष्ट होणार असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे.

असे असले तरीही कोमुनिदादकडून प्रस्ताव येताच ईएसजीने आपल्या निविदा दस्तऐवजात सदर जागेला ‘प्रकल्प स्थळ’ म्हणूनच संबोधले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article